Crime  
मराठवाडा

कौटुंबिक वादातून क्रूर बापाने मुलीच्या डोक्यात दगड घालून केला खून, लातूर जिल्ह्यातील घटना

गौस शेख

बेलकुंड (जि.लातूर) : घरामध्ये नेहमीचं होणाऱ्या कौटुंबिक वादाच्या कलहातून निर्दयी बापाने स्वत:च्या पोटच्या १६ वर्षीय मुलीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.१५) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आशिव (ता.औसा) येथे घडली. साक्षी सुधीर बंडगर (वय १६) असे खून केलेल्या मुलीचे नाव आहे. सुधीर बंडगर (वय ४५) असे खून करणाऱ्या निर्दयी बापाचे नाव आहे़. आशिव येथील मुळ रहिवासी सुधीर हा पत्नी लता आणि चार मुली व एक मुलगा यांच्यासोबत राहतो.

दरम्यान सुधीर हा शनिवारी (ता.१४) रात्री पत्नी व मुलगी साक्षी हिच्या सोबत दारू पिऊन वाद घालू लागला. त्यानंतर रात्री झालेल्या वादाचा राग मनात धरून सुधीरने मुलगी साक्षी हिच्या डोक्यात दगड घातला. यात साक्षी गंभीर जखमी झाल्याने तिला पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुधीर याला भादा पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी लता सुधीर बंडगर यांच्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप भारती, पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक, बिट अंमलदार कमाल शेख हे करित आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT