Fauzia Khan sakal
मराठवाडा

Fauzia Khan : भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना खुर्चीतून खाली खेचा : खासदार डॉ. फौजिया खान

Assembly Election 2024 : विजयादशमीच्या दिवशी परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी भ्रष्टाचार आणि अनिष्ट गोष्टींवर जोरदार टीका केली.

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : विजयादशमीचा दिवस हा अत्यंत चांगला दिवस असून गुंडगिरीवर सभ्यतेचा विजय, भ्रष्टाचारावर विकासाचा विजय, अनितीवर नीतीचा विजय आणि अनिष्ट गोष्टीवर सत्याचा विजय होईल, असे प्रतिपादन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते (शरद पवार गट) राजाभाऊ फड यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. पुढे बोलताना खान म्हणाल्या की, मागील लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता सर्वसामान्य मतदारांचे, नागरिकांचे दिवस आले आहेत. राज्यातील युवक परिवर्तनाच्या मानसिकतेत आहेत.

पालकमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की, तुम्ही स्वतः कृषिमंत्री असताना देशात सर्वाधिक आत्महत्या तुमच्याच जिल्ह्यात का? याचे खरे कारण म्हणजे इथला भ्रष्टाचार आहे. याला तुम्हीच तर खतपाणी घातले आहे, असा घणाघात डॉ. फौजिया खान यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला. यावेळी मतदारसंघातील अनेक गावांतून आलेल्या आणि शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला.

यावेळी वाघाळा, कावळ्याची वाडी येथील नागनाथ सलगर, सौरभ सलगर तर शहरातील एकमीनार चौक तसेच वाल्मिकी नगर येथील शेख हसन, शेख इक्बाल, सावता माळी आणि गणेशपार भागातील परमेश्वर ठाकरे यांनी प्रवेश केला. याबरोबरच येळंब येथील संगीता होळंबे, शहरातील रेखा कांबळे, नागापूर येथील सतीश सोनटक्के यांचाही जाहीर प्रवेश झाला तर मलिकपुरा भागातील पठाण नोमन यांच्या नेतृत्वात ४०० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

यावेळी राजेभाऊ फड म्हणाले की, पक्षात काम करीत असताना पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यातील जनतेने मागील लोकसभेला परिवर्तन घडवून आणले. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार पक्षाकडून दिला जाईल तोच आमदार म्हणून निवडून येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते अब्दुल समद, तालुकाध्यक्ष शंकर शेजुळ, ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष एच.यु. फड, शहराध्यक्ष अशोकराव मुंडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वर्षा रायभोळे, युवा नेते सोपानराव तोंडे, युवा शहराध्यक्ष सय्यद फिरोज, महेबुब कुरेशी, दिपाली सावंत, अश्विनी सरवदे, श्रीदेवी शिंदे हजर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT