mahavitran sakal
मराठवाडा

महावितरणच्या अधिकाऱ्यांत ढिश्शाम - ढिश्शाम

अधीक्षक अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांमध्ये जुंपली

सकाळ वृत्तसेवा

बीड : ऐन रब्बी हंगामातील पिके जोमात असून पाणी देण्याच्या वेळी थकित देयकांच्या कारणांनी कृषी पंपांच्या वीज जोडण्या तोडून शेतकऱ्यांना ‘शॉक’ देणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांतच आता ‘ढिश्शाम - ढिश्शाम’ सुरु झाले आहे. दोन दिवसांपूर्वी (बुधवारी, ता. आठ) अधीक्षक अभियंता रविंद्र कोलप व कनिष्ठ अभियंता नवनाथ पोटभरे यांच्यामधील हाणामारीची घटना पोलिस ठाण्यात पोचली आहे.

कार्यालयाबाहेर एका हॉटेलात घडलेल्या या प्रकाराच्या परस्पर फिर्यादींवरुन शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मित्राला भेटण्यास हॉटेलात गेल्यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप यांनी कानशिलात लगावली. त्यानंतर धमक्याही दिल्या, अशी फिर्याद अतिरिक्त अभियंता नवनाथ पोटभरे यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दिली आहे. नवनाथ पोटभरे खालापुरी (ता. शिरूर) येथील महावितरणच्या उपविभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे कनिष्ठ अभियंता पदाचा पदभार आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा ते एका हॉटेलमध्ये थांबलेल्या मित्राला भेटायला गेल्यानंतर अधीक्षक अभियंता रवींद्र कोळप हे होते. त्यांनी पोटभरे यांना तू इथे कसा काय आला, असे म्हणत धमकावले. त्यानंतर त्यांच्या गालात दोन चापटा मारल्या. यावेळी मित्राने सोडवासाेडव केली, अशी फिर्याद श्री. पोटभरे यांनी दिली. दरम्यान, यापूर्वीही अधीक्षक अभियंता कोळप यांनी एका लाईनमन करवी आपणास मारहाण केली होती. मात्र, कोळप हे वरिष्ठ अधिकारी असल्याने तेव्हा दुर्लक्ष केले होते, असे अतिरिक्त अभियंता पोटभरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

तर, अधीक्षक अभियंता रविंद्र कोलप यांनीही नवनाथ पोटभरे यांच्या विरुद्ध मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. हॉटेलमध्ये जात असताना त्यांना श्री. पोटभरे यांनी अडविले. जुना वाद उकरुन श्री. कोलप यांना श्री. पोटभरे यांनी लाथा बुक्क्यांनी व वाहनाच्या चावीने मारहाण करण्यात आली, असे त्यांनी शिवाजी नगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांवरही परस्पर विरोधी फिर्यादींवरुन गुन्हा नोंद झाला.या घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT