फोटो 
मराठवाडा

पाच हजाराचा कोंबडा तर दीड लाखाचा वळू

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : दक्षिण भारतात प्रसिध्द असलेल्या माळेगावच्या खंडोबा यात्रेत दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.25) पशु, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन लक्षवेधी ठरले. यात जातीवंत पशुसह अश्व व श्वान मोठ्या प्रमाणात आले होते. यातील झुंजीच्या कोंबड्याची किंमत तब्बल पाच हजार तर लाल कंधारी वळूचा भावही एक लाख 65 हजार सांगण्यात आला. पशुप्रदर्शनात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या काळ्या कपिला गायीचे आकर्षण ठरले.


जिल्हा परिषदेच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या श्रीक्षेत्र माळेगावच्या खंडोबा यात्रेची सुरवात मंगळवारपासून (ता.24) देवस्वारीने झाली. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.25) पशुसंवर्धन विभागाकडून पशु, अश्व, श्वान, कुक्कूट प्रदर्शन आयोजित केले होते. यात नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, लातूर व बीड जिल्ह्यातील पशुपालकांनी सहभाग घेतला. दुपारी एक वाजता सुरु झालेल्या पशु प्रदर्शनासाठी नामवंत देशी - विदेशी जातीचे पशु दाखल झाले होते. पशुप्रेमी नागरीकांनी प्रदर्शन स्थळी गर्दी केली होती. यात झुंजीचे मुर्गेही दाखल झाले होते.

झुंजीचा असील मुर्गा (हैदराबादी)


नांदेड शहरातील बाळकृष्ण धर्मापुरीकर यांनी झुंजीचा असील मुर्गा (हैदराबादी) आणला होता. त्याची किंमत पाच हजार असल्याचे सांगीतले. तर साप्ती (ता. हदगाव) येथील दिंगबर कदम यांनी वनराज - गिरीराज जातीचा कोंबडा आणला होता. त्याची किंमतही त्यांनी पाच हजार सांगितली. या प्रदर्शनातील सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे देशी लाल कंधारी व देवणी गाय व वळू हे होते. अनेक शेतकऱ्यांनी जीवापाड जपणाऱ्या देखण्या जनावरांना माळेगावला आणले होते. यात लिंबोटी (ता. लोहा) येथील माधव सातनर यांनी लालकंधारी वळू आणला होता. दोन दात असलेला अडीच वर्ष वयाचा वळू सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. याची किंमत एक लाख 65 हजार असल्याचे सातनर यांनी सांगितले. तसेच लातूर जिल्ह्यातील कुणकी (ता. जळकोट) येथील संतोष तिडके यांनी अतिशय देखणी देवणी गाय आणली होती. अडीच वर्ष वय असलेल्या या गायीची किमंत त्यांनी सत्तर हजार सांगीतली.


जिल्हाधिकाऱ्यांची कपिला गाय आकर्षण


पशुपालक तसेच पशुप्रेमी असलेले नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची काळी कपिला गाय तसेच सिंबा गोरा पशु प्रर्शनात सहभागी झाले होते. यात हे गाय व गोरा यात्रेकरु तसेच पशुपालकांचे आकर्षण ठरले. नखशिखांत काळी असलेल्या गायीला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी काहींनी पहिल्यांदा कपिला गाय पाहता आली असल्याचे सांगितले.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT