जिंतूर(जि.परभणी) : गोरगरीब, मजुर आणि हातावर काम करून पोट भरणाऱ्यांची अबाळ होऊनये यासाठी टाळेबंदीच्या पहिल्या दिवसापासून नागेश आकांत यांचा मदतीचा हात पुढे आहे. औंढा ते जालना रस्त्यावर भुकेल्यांना खाऊपिऊ घालून मिळेल त्या वाहनाने बसून देत त्यांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करतात.
नागेश यांची तशी एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे. घरी आठवा अठराविश्व दारिद्र्य असली तरी प्रत्येक समाजसेवेच्या कामासाठी तो सदैव पुढे येतात. लॉकडाउन सुरू झाले आणि मजुर आणि हातावर काम करून पोट भरणाऱ्यांची अन्नासाठी भ्रांत सुरू झाली. नागेशने शहरातील दानधर्म करणाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्या झोपड्यापर्यंत अन्नधान्य पोहोचवले. टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे, मुंबई, नगर, विदर्भ, आंध्रप्रदेशातील हजारो लोक पायपीट करत जिंतूरमार्गे आपल्या गावी अनवाणी पायाने आणि भुकेलेल्या पोटाने जात असताना नागेश यांनी व्यापारी व दानशूर यांच्या मदतीने त्यांची नाष्टा, चहापान व जेवणाची व्यवस्था केली. दररोज २०० ते ३०० लोकांच्या जेवणाच्या व्यवस्था होत आहे. अन्नदान करणारे नागेशला स्वतःहून संपर्क करून नाव न पुढे येऊ देण्याच्या अटीवर मदतही करत आहेत.
स्थलांतरित मजुरांची वाट पाहत उभा
सकाळी सहा वाजतापासून रात्री बारा वाजेपर्यंत तो औंढा जालना रस्त्यावर असलेल्या अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ रस्त्याने जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांची वाट पाहत उभा असतात. त्यांना खाऊपिऊ घालून रस्त्याने जाणाऱ्या ट्रक चालकांना हातापाया पडून मजुरांना गाडीत बसून पुढे सोडण्याची सुद्धा विनंती करतात. तर कधी आईच्या काखेतील लेकरू आपल्या हातात घेऊन त्याला खेळवत असताना त्यांच्या अर्ध दुःख वाटून घ्यायचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतात.
हेही वाचा : होम क्वारंटाइन ऊसतोड मजूरांनी फुलवली बाग
मदतीसाठी अनेकांचे हात पुढे
`मजुरांची लोंढे मंठा, चारठाणा गावापर्यंत आले कि, तेथील समाजसेवी नागेशला भ्रमणध्वनीवर संपर्क करून मजुरांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी फोन करतात. हीच मजूर जिंतूर येथे येईपर्यंत नागेश त्यांची जेवणाची, चहा पाण्याची व्यवस्था करून ठेवतो. आलेल्या मजुरांना किंवा आजारी पडलेल्या मजुरांना सरकारी दवाखान्यात नेऊन त्यांना गोळ्या आणि त्यांच्या उपचाराची सुद्धा व्यवस्था करतात. त्यांच्या मदतीसाठी आज दहा ते पंधरा समाजसेवक मदतीसाठी उभे राहिले. एकाएकी लढणारा नागेशच्या मदतीला आज अनेकांचे हात पुढे आलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.