परभणी : सामाजिक बांधिलकी म्हणून पथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्याकडून गरजूंना अन्न पॅकिटांचे वाटप करण्यात येत आहे. परभणी जिल्हा रुग्णालयासह सोनपेठ, पाथरी, मानवत शहरात गरजूंना अन्न पॅकिटे वाटपाचे नियोजन शनिवार (ता. २८) पासून करण्यात आले आहे.
तीनही शहरांत वाटप
मागच्या पाच सहा दिवसांपासून ‘कोरोना’मुळे संपूर्ण देश लाॅकडाऊनमध्ये आहे. आणि तो निर्णय सर्वांच्या हिताचाच आहे. पण या काळात अनेकजण जे बेघर, अनाथ आहेत आणि काही कुटूंब असे आहेत ज्यांचा उदरनिर्वाह हातावरच असतो, अशा गरजूंसाठी आमदार सुरेश वरपुडकर यांचा परिवार पुढे आला आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समशेर वरपुडकर यांनी शनिवारी परभणी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व सोनपेठ शहरातील गरजू कुटुंबांना १५०० अन्न पॅकिटे पुरविण्याची व्यवस्था नियोजनपूर्वक केली आहे. रविवार (ता. २९) पासून लाॅकडाऊनच्या या पूर्ण काळात पाथरी मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ या तीनही शहरांत वाटप केल्या जाणार असलेल्याची माहिती युवा नेत्या प्रेरणा वरपुडकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट
हेही वाचा ...
परभणी शहरात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू
परभणी : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने निर्जंतुकीकरणासह फवारणीची कामे सुरू केली आहेत.
महापालिकेने तीन-चार दिवसांपूर्वी शहराच्या मुख्य रस्त्यांवर फवारणी करून निर्जंतुकीकरणाचे काम केले होते. परंतु, त्यासाठी आवश्यक असलेले केमिकल संपल्यामुळे महापालिकेने ही मोहीम थांबविली होती. कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त रमेश पवार यांनी एका बैठकीत सांगितले होते.
टप्प्याटप्प्याने निर्जंतूक
एका व्यावसायिकाने केमिकल देण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. त्यांना सोबत वाहने देण्यात आली होती. पण, तिथेदेखील साठा नव्हता. म्हणून संबंधित व्यापाऱ्याला नाशिक येथे पाठविण्यात आले. पण नाशिक येथे सुद्धा केमिकल उपलब्ध नव्हते. ते गुजरात राज्यातून येणार असल्यामुळे ते व्यापारी तसेच पालिकेचे कर्मचारी ते थांबले असून ते आल्यानंतर पुन्हा निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात येऊन संपूर्ण शहर टप्प्याटप्प्याने निर्जंतूक करण्याचे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अष्टभुजा देवी मंदिरापर्यंत अग्निशमन वाहनातून केमिकल टाकून फवारणी करण्यात आली. नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.