नांदेड : नांदेड वनपरिक्षेत्रात एका ज्वारीच्या शेतामध्ये ज्वारीची कापणी चालू असताना बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याचे गावकऱ्यांनी दूरध्वनीद्वारे वनविभागाला कळविले. त्यानंतर तात्काळ नांदेड वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. तेथील परिसराची टीमने पाहणी केली. तसेच ट्रॅप कॅमेराच्या साह्याने बिबट आई - पिलांची भेट घालून दिली. यासाठी वनविभागाला चांगलीच कसरत करावी लागली.
सदरील परिसर जंगलाला लागून असलेल्या परिसरात ऊस व केळी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे सदरील पिलाची आई परिसरातच असल्याचा अंदाज आल्यानंतर त्या पिलास त्याच्या आईसोबत भेट घालून देण्याचे निश्चित करण्यात आले. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील निर्देशाप्रमाणे तसेच मादी बिबट व तिच्या पिलाची ताटातुट झाली असती तर पिलाचे जिवंत राहण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात राहिली असती. तो जगला असता तरी त्याचे पूर्ण आयुष्य बंदिवासात पिंजऱ्यात गेले असते.
तंत्रज्ञानाचा वापर करून पिलावर लक्ष ठेवण्यात आले.
पिलाची ताटातुट झाल्यामुळे मादी बिबट आक्रमक होण्याची शक्यता होती. अश्या परिस्थीतीमध्ये मादी व पिलाची भेट घडवून आणणे हा कठीण पण संयुक्तिक पर्याय असल्याचे वन विभागाच्या टीमचे एकमत झाले. त्यानंतर तो परिसर निर्मनुष्य करून त्या ठिकाणी वन कर्मचाऱ्याद्वारे निगराणी खाली सील करण्यात येवून पहारा ठेवण्यात आला. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिलावर लक्ष ठेवण्यात आले. दोन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर वन विभागाला माता व पीलाचे पुनर्भेट करून देण्यात यश आले. या संपूर्ण घटनेचे ट्रॅप कॅमेराद्वारे चित्रण करण्यात आले.
येथे क्लिक करा - Video- कौतुकास्पद : मजूर स्व: खर्चातून वाटतो इडली- वडा
अशा घटना वन विभागात अत्यंत दुर्मिळ समजल्या जातात
अश्या प्रकारच्या घटना वन विभागात अत्यंत दुर्मिळ समजल्या जातात. यामुळे नांदेड वन विभागाच्या टीम समाजाच्या सर्व स्तरातून व वन्यजीव प्रेमी व नागरिकांतून अभिनंदन होत आहे.
उपरोक्त प्रयोग यशस्वी करण्यासाठी नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. कवळे, मानद वन्यजीव रक्षक अतींद्र कट्टी, प्रसाद शिंदे, वनपाल श्री. गव्हाणे, वनरक्षक श्री. दासरवाड, सय्यद वसीम, श्री. शिंदे, श्री. वाठोरे, श्री. तेलंग व इतर वनकर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.