fortifications of historic fort Antur collapsed tourism  sakal
मराठवाडा

ऐतिहासिक किल्ले अंतूरची तटबंदी ढासळली

कन्नड : डागडुजीवर तब्बल चार कोटी रुपये खर्च, पर्यटनप्रेमींची नाराजी

राजानंद सुरडकर, कन्नड

कन्नड : कन्नड तालुक्यातील बहामनी काळातील ऐतिहासिक किल्ले अंतूरची तटबंदी सतत सुरू असलेल्या पावसामुळे ढासळली आहे. विशेष म्हणजे या किल्ल्याच्या डागडुजीवर चार कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही ही तटबंदी ढासळल्याने दुर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी पर्यटनप्रेमींनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी किल्ल्या खालोखाल रचनात्मक सौंदर्याने अंतूर किल्ला नटलेला आहे. या ऐतिहासिक ठेवण्याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. सध्या तालुक्यात संततधार भिजत पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका ऐतिहासिक गड किल्ल्यांनाही बसू लागला आहे. त्यातच पुरातत्त्व खात्याचे उदासीन धोरण व दुर्लक्षामुळे हा ऐतिहासिक राज्य शासन संरक्षित वारसा धोक्यात आला आहे. २०१७ मध्ये किल्ले अंतूरच्या डागडुजीसाठी चार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. सदरील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे हे सुशोभीकरण एक दोन वर्षांपुरतेच सुस्थितीत राहू शकले.

सततच्या पावसामुळे या बांधकामातील पितळ उघडे पडले आहे. पहिल्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता दोन वर्षांपूर्वी खचला होता. तो अद्यापही दुरुस्त करण्यात आला नाही. येथून जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागते. किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावरील बुरूज तटबंदीचा भाग ढासळला आहे. तसेच बालेकिल्ल्यावरील मलिक अंबरने बांधलेल्या तलावालगतच्या भिंतीचा भाग दुसऱ्यांदा कोसळला आहे. तर किल्ल्याच्या पूर्व बाजूची भव्य तटबंदी पंधरा ते वीस फूट लांबपर्यंत ढासळली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या बांधकामाचा काही भाग दोन वर्षांत दुसऱ्यांदा ढासळतोच कसा असा प्रश्न दुर्गप्रेमींनी उपस्थित केला आहे. किल्ल्यावरील अस्वच्छता, प्लॅस्टिकचा कचरा यामुळे किल्ल्यावरील प्रदूषण वाढत असून किल्ल्याच्या संरक्षणासाठी येथे कंत्राटी सुरक्षारक्षक नेमलेला आहे. परंतु बावीस महिन्यांपासून त्यांचे वेतन थकले आहे.

कन्नड, नागापूर ते किल्ले अंतूरपर्यंत जाणारा रस्त्याची ठिकठिकाणी चाळणी झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीकडेही प्रशासनाने काणाडोळा केला आहे. या प्रकाराबाबत पर्यटक, दुर्गप्रेमींनी गैरसोय केली आहे. सदरील बांधकामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे. ढासळलेल्या वास्तूची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी सह्याद्री प्रतिष्ठानचे मराठवाडा प्रशासक डॉ. पवन गिरी, अरुण थोरात, ॲड.राजेंद्र निकम, डॉ.संजय पाईकराव, शिवराज पाटील, जगदीश कंचार, विष्णू भिंगारे, आकाश बारगळ, इतिहास अभ्यासक डॉ.जगदीश भेलोंडे, डॉ.शिवाजी हुसे, आदी दुर्गप्रेमींनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT