परभणी : परभणी जिल्ह्यात रविवारी (ता.२८) चारजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या चार रुग्णांपैकी दोन रुग्ण परभणी शहरातील असून एक सोनपेठ व एक जिंतूर शहरातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरवात झाली असून रविवारी (ता. २८) अचानक चार रुग्ण वाढल्याने आता रुग्णसंख्या १०९ वर गेली आहे. परभणी शहरातील गव्हाणे चौक परिसरातील एक व दर्गारोडवरील गंगापुत्र कॉलनीतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तिसरा रुग्ण हा राजगल्ली सोनपेठ, तर जिंतूर शहरातील बामणी प्लॉट भागात कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले आहेत. सध्या परभणी जिल्हा रुग्णलायात १५ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात व तालुक्याच्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, चार ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत.
हेही वाचा...
हेही वाचा: कुठे जोरदार, तर कुठे हलका... पण आला -
‘एचएआरसी’तर्फे एक हजार मुलींना मास्क
परभणी : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे शनिवारी (ता. २७) सामाजिक व आर्थिक विकास महामंडळ या संस्थेच्या नवा मोंढा येथील कार्यालया पालम तालुक्यातील किशोरवयीन मुलींसाठी एक हजार मास्क संस्थेच्या संचालक श्रीमती माणिकताई सूर्यकांत कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
पालम तालुक्यातील किशोरी मुलींचे आरोग्य संवर्धन व्हावे या करिता एसइडीटी स्वप्नभूमी केरवाडी संस्थे मार्फत या मुलींच्या आरोग्य व स्वच्छताविषयी जनजागृती व लॉकडाउनमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी यासाठी जनजागृतीपर उपक्रम सुरू आहे. याच संदर्भात स्वप्नभूमी संस्थेने काही दिवसांपूर्वी एचएआरसी संस्थेकडे एक हजार मास्कसाठी पत्राद्वारे आवाहन केले होते.
हेही वाचा: परभणीत साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण -
आर्सेनिक अल्बम ३० च्या १२५ डोसेस सुपूर्द
एचएआरसी संस्थेतर्फे लोकसहभागातून जमा निधीतून एक हजार मास्क एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. आशा चांडक, राजेश्वर वासलवार, गोपाल मुरक्या यांच्या पुढाकारातून सुपूर्द करण्यात आले. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आर्सेनिक अल्बम ३० च्या १२५ डोसेस सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती माणिकताई कुलकर्णी, विष्णू जाधव, संदीप बेंडसुरे, मन्मथ गडमवार, ज्ञानोबा एडके, संदीप गडगिले, दत्ता पुंड आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.