jpg 
मराठवाडा

‘या’ मतदारसंघात चार आमदार झाले मंत्री

बाबूूराव पाटील

भाेकर, (जि.नांदेड)ः भाेकर विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून मंत्री हाेण्याचा पायंडा सुरू झाला ताो आजतागायत तसाच कायम आहे. या मतदारसंघातील मतदारांनी आजपर्यंत चार लाेकप्रतिनिधींना केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व मंत्री पदावर बसविले आहे. गल्ली ते दिल्लीत भाेकरचे नाव राजकीय पटलावर काेरल्या गेले. या वेळी काँग्रेस पक्षाला संधी नसताना ऐनवेळी अशाेक चव्हाणांना मंत्री हाेण्याचा बहुमान मिळाल्याने मतदारसंघाने परंपरा कायम राखली आहे. अशा किमयागार मतदारांनी चार चाँद लावल्याने भाग्य उजळून निघाले आहे. 

भाेकर तालुका निजाम राजवटीत आंध्र प्रदेशात समाविष्ठ हाेता. मराठवाडा मुक्तिसंग्रामानंतर त्याचे विभाजन मराठवाड्यात झाले आहे. सध्या तेलंगणा सिमेवर अगदी हाकेच्या अंतरावर तालुका आहे. प्रारंभी १९५१ भाेकर विधानसभा तर सन १९५७ त्याचे नामांतर धर्माबाद विधानसभा असे करण्यात आले. सन १९६७ मात्र, पुन्हा भाेकर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळख झाली. ती आजतागायत तशीच कायम आहे. या वेळी सन १९५१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून दिगंबरराव बिंदू यांनी उमेदवारी दाखल केली आणि सहा हजार ५१२ मते घेऊन ते विजयी झाले. 

शंकरराव यांचीही वाटचाल येथूनच
लगेच त्यांना त्याकाळी मंत्रिपदाची माळ गळ्यात टाकली. पहिल्या मतदारसंघाच्या निर्मितीत मंत्री हाेण्याचा मान मिळाला. हाच पायंडा आज सत्तर वर्षांनंतरही कायम आहे, हे विशेष उल्लेखनीय बाब आहे. त्यानंतर (कै.) शंकरराव चव्हाणांनी याच मतदारसंघातून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. सन १९५७ ते आमदार म्हणून विजयी झाले. त्यांनी सलग चार वेळा यशश्री खेचून आणली. दरम्यान, त्यांना मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्री हाेण्याचा बहुमान प्राप्त झाला. यामुळे चव्हाणांचं मतदारांशी वेगळं नातं निर्माण झालं.

मागील ७० वर्षांची परंपरा 
सन १९७८ (कै.) बाबासाहेब देशमुख गाेरठेकरांनी शंकररावांचा पराभव करून काँग्रेसचा गड आपल्या ताब्यात घेतला. ते अपक्ष म्हणून निवडून आले हाेते. गाेरठेकरांनी तीनवेळा यशश्री पदरात पाडून घेतली. त्यानंतर सन १९९० मध्ये डाॅ. माधवराव किन्हाळकरांनी उमेदवारी दाखल केली आणि त्यांना मतदारांनी स्वीकारले. त्यांनी दाेनवेळा सत्ता काबीज केली. शरद पवारांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांना गृह व महसूलमंत्री हाेण्याची संधी मिळाली आहे. याेगायाेगाने मतदारसंघाची फेररचना झाली आणि सन २००९ अशाेक चव्हाण यांनी भाेकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली.
सर्वाधिक मताधिक्य घेऊन ते विजयी झाले. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री हाेण्याचा मान मिळाला जाे आहे. लाेकप्रतिनिधी भाेकर मतदारसंघातून विजयी हाेताे, त्यांना मंत्री हाेण्याची सुवर्णसंधी मिळते, हे मागील ७० वर्षांची परंपरा आहे. 

थेट मंत्री करण्याची आगळीवेगळी कसब
आजपर्यंत येथील जनतेने चाैघांना मंत्रिपदावर नेवून बसविले आहे. हे विशेष हाेय. आता नुकत्याच लाेकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या. यात लाेकसभेला भाजपने बाजी मारली, तर महाराष्ट्रात भाजपा सर्वात माेठा पक्ष असूनही अचानक राजकीय वारे उलट्या दिशेने फिरल्याने भाजपाला संधी असूनही सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामु्ळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची महाविकास आघाडी झाली. या आघाडीने जे काँग्रेस चाैथ्या स्थानी हाेते, ते सत्तेत आल्याने ऐनवेळी अशाेक चव्हाणांना मंत्री हाेण्याचा मान मिळाला आहे. ज्या भाेकर विधानसभा मतदारसंघातील जनतेने विधानसभेत पाठविलेल्या उमेदवारांना थेट मंत्री करण्याची आगळीवेगळी कसब हेरली आहे. त्याचे सर्वत्र काैतुक केले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT