Hingoli Accident esakal
मराठवाडा

Hingoli Accident : बस-ट्रकच्या अपघातात ४ ठार, चोवीस प्रवासी जखमी

काही प्रवासी धडक झाल्यानंतर ट्रकच्या खाली जाऊन अडकून पडले.

संजय कापसे

कळमनुरी (जि.हिंगोली) : कळमनुरी-बाळापूर मार्गावर असलेल्या पार्टी मोड वळण रस्त्याजवळ खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू, सहा जण गंभीर तर १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार (ता.२९) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. नांदेड (Nanded) येथून खासगी प्रवासी बस ही प्रवासी घेऊन हिंगोलीकडे (Hingoli) येत असताना कळमनुरी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पार्टी मोड वळण रस्त्यावर हिंगोलीहुन नांदेडकडे जाणारा ट्रक (आरजे ०२ जीबी ३९४५) या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात खासगी प्रवासी बसमधील प्रवासी गंभीर जखमी, तर काही प्रवासी धडक झाल्यानंतर ट्रकच्या खाली जाऊन अडकून पडले. (Four People Died In Bus Truck Accident In Kalamnuri Of Hingoli)

अपघातानंतर साळवा व आजूबाजूला असलेल्या ढाब्यावरील उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या महिला व नागरिकांना कळमनुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यासाठी धावपळ केली. अपघातानंतर ट्रकच्या खाली दबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी उपस्थित नागरिक व पोलिस प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या जेसीबी यंत्राचा वापर करून ट्रकच्या खाली दबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातामध्ये चार जण मृत्यू पावले असून चोवीस प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात पंचफुला गजभार (वय ७०, रा.बाभळी, ता. कळमनुरी), विठ्ठल कनकापूरे (वय ६०, रा.ब्राह्मगाव ता.उमरखेड), राजप्पा दगडू अजरसोंडकर (४५) व त्रिवेणी बाई अजरसोंडकर (४८ रा.अजरसोंडा, ता.औंढा) यांचा मृत्यू झाला. तर बाबुराव ज्ञानोजीराव मोरे (५०, रा.वारंगा फाटा, ता.कळमनुरी), सुभाष पोळ (४०, रा.कलगाव, जि. हिंगोली), विठ्ठल श्रावण गजभार (६०), भाग्यश्री विठ्ठल गजभार ( ३०, रा.बाभळी, ता.कळमनुरी), नंदा काळे (५०, रा हिंगोली), मो इक्बाल मो ईबाद (३६, रा.नांदेड) हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. अपघातातील इतर जखमी पुढील प्रमाणे गजानन व्यवहारे (५१, रा कळमनुरी, स माबुद स आमीन (५३) , शे खैरात शे सत्‍तार (५५), मो रफीक मो लतीफ (४५, हिंगोली), दिगंबर बहादुरे (६०, पिंपरी खुर्द, ता.कळमनुरी), सुनंदा मनोहर इंगोले ( ४७ नेरली, नांदेड), इक्बाल खान बशीर खान (२९, रा.अलवर राजस्थान), गौतम डोंगरे (५०, डोंगरकडा, कळमनुरी), खैसर बेगम काजी अलाउद्दीन (६०), सय्यद अकमल (०८), सोफिया बेगम तसलीम (६०, सर्व रा.अर्धापूर) नशेख खाजामिया शेख अब्दुल (७०), शेख आरेफा शेख खाजामिया (६० रा. लाख मेथा, ता.औंढा), रामप्रसाद गडदे (२६, रा. तांदुळवाडी, सेनगाव), शरद शिंदे (३१, रा सेनगाव), कुंडलिक नागरे (४३), शेख हबीब शेख महेबुब (५०, रा.हिंगोली) हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान या अपघातात खासगी प्रवासी बसमधून प्रवास करणारे औंढा नागनाथ तालुक्यातील अजर सोंडा येथील राजप्पा दगडू अजर सोंडकर व त्यांच्या पत्नी त्रिवेणी या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT