education esakal
मराठवाडा

Jalna : अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणार

जैन संघटनेचा उपक्रम; ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

जालना : भारतीय जैन संघटनेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे व कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक श्री शांतिलाल मुथ्था यांनी दिली. यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांनी ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन हस्तीमल बंब आणि दिनेश राका यांनी केले आहे.

संकटात सापडलेले अनाथ मुले प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबर मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या आत्मविश्‍वास वाढविणे, मोठी स्वप्ने दाखविणे व ते साकरण्यासाठी सक्षम करणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे व कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.

शिक्षणासह राहण्याचे, जेवणाचे, औषधी व डॉक्टर सर्व सोय केली जाणार आहे. त्यांची पाचवी ते बारावीपर्यंत सर्व पालन-पोषणाची जवाबदारी स्वीकारण्यात आली आहे. पुणे येथील वाघोली शैक्षणिक संकुलात मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये वर्ग पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने अनाथ मुलांना पुणे पाठविण्यात येणार आहे. ज्या मुलांची आई किंवा वडील यापैकी एकाचा किंवा दोघांनी आत्महत्या केली आहे, अशा मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.

या क्रमांकावर करा संपर्क

यात जात-धर्म, पंथ यांच्या कोणता ही बंधन राहणार नाही. पालकांचे संमतिपत्र व आवश्यक कागदपत्रांच्या आधारे या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. यासाठी प्रा. सुरेश साळुंके (७७२२०१८५८६), सविता सुतार (९८६०१०५३२६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हस्तीमल बंब व दिनेश राका यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT