Maize crop sakal
मराठवाडा

Agriculture : उन्हाने करपलं रान देवा, जळलं शिवार...!

फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

नवनाथ इधाटे

फुलंब्री - सलग तीन वर्षांपासून पावसाच्या बदललेल्या प्रक्रियेमुळे तालुक्यात सलग तीन वर्षांपासून खरीप हंगाम नावालाच राहिला आहे. यंदाही तब्बल पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतशिवारातील सर्वच पिकं करपली आहेत. रिमझिम पडणाऱ्या पावसावर पिके जगणे कठीण झाले आहे.

यंदाच्या खरीप हंगामातील पिके उन्हाने सुकली असल्याने पिके करपू लागली आहेत. उन्हाने करपलं रान... देवा जळलं शिवार...! अशी आर्त हाक शेतकरी मारू लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली असल्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या करूनदेखील दमदार पाऊस न झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.

पेरणी करूनदेखील पुन्हा पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे आता उभ्या शेतातील सर्व पीक जळून खाक होत आहे. मका, कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग व मक्याच्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून जेमतेम उत्पादन होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात सुमारे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड झाली आहे.

तालुक्यांमधील कोरडवाहू क्षेत्रावरील मका आणि कापसाची वाढ पूर्ण खुंटली आहे. तालुक्यात सर्वाधिक पीरबावडा, वडोद बाजार, आळंद आणि फुलंब्री या महसूल मंडळाला सर्वधिक फटका बसलेला आहे. तर डोगरी भागातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

दुष्काळ जाहीर करा

पावसाअभावी तालुक्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. मागील गेल्या दोन महिन्यांपासून खरीप पिकाची लागवड झाल्यानंतर एकही दमदार पाऊस फुलंब्री तालुक्यात पडला नाही. तालुक्यातील विहिरी, नद्या, नाले, कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू

Snapchat New Feature : खुशखबर! स्नॅपचॅटमध्ये आलं भन्नाट फीचर; तुम्ही पाहिलं काय?

Michael Waltz : मायकेल (माइक) वाल्ट्झ- `इंडिया कॉकस’ व भारत

SCROLL FOR NEXT