file photo 
मराठवाडा

Video : बसगाड्यामध्ये सोशल डिस्टसिंगचा फज्जा!

गणेश पांडे

परभणी : अनलॉकनंतर जिल्ह्यातंर्गत एसटी महामंडळाच्या बससेवा सुरु करण्यात आल्या आहेत. या बससेवा सुरु करतांना सोशल डिस्टसिंगचा वापर केला जावा, असे आदेश देण्यात आले होते. परंतू या नियमाला सर्रास धाब्यावर बसविले जात आहे. कोणत्याही बसमध्ये झिकझिक पध्दतीचा अवलंब केला जात नसल्याचे दिसून येत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न पुढे येत आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गानंतर लॉकडाउन करण्यात आले. लॉकडाउनमुळे जिल्ह्यासह जिल्हाच्या बाहेर जाण्याऱ्या बससेवा बंद करण्यात आली. तब्बल अडीच महिणे बससेवा बंद राहीली. जिल्हाबंदी असल्याने काही दिवसापूर्वी जिल्हांर्गत बससेवा सुरु करण्यात आली. जिल्ह्यातील परभणी, पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर या चारही आगारातून जिल्हाअंतर्गत बससेवेला गेल्या महिण्याभरापासून प्रारंभ झालेला आहे. सर्वाधिक प्रतिसाद हा गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी या मार्गावर धावणाऱ्या बसला मिळत आहे. परंतू नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे.  काही बस अक्षरशः पाच-दहा प्रवासी देखील घेऊन धावत आहेत. मात्र, सकाळी आणि सायंकाळी धावणाऱ्या बसमध्ये तोबा गर्दी होत आहे. बसमध्ये बसण्यासाठी तसेच जागा पकडण्यासाठी नागरिक बसच्या दरवाजाजवळ प्रचंड गर्दी करत आहेत.

प्रवाशी ऐकत नाहीत  
आतमध्ये देखील दोन सीटवर एकाच व्यक्तीने बसावे अश्या सुचना असतानाही बसमध्ये प्रवासी गर्दी करत आहेत.  प्रवासी बसताना किंवा उतरताना सॅनिटायझरचा वापर होतांना दिसत नाही. अनेकांकडून मास्कचा वापर देखील होताना दिसत नाही. शिवाय प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यासाठीचे कुठलीही साधने नाहीत. बसमध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था कशी असावी याच्या सुचना देण्यात आलेल्या असतांनाही त्याचे पूर्णपणे पालन केले जात नाही. परंतू प्रवाश्यांना कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी कुणी ऐकत नाही गर्दी करू नका, एका सीटवर एकचजण बसा असे वारंवार सांगतो. परंतू कुणीही ऐकत नाही यातून वाद निर्माण होत आहे, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.

उपाययोजना करण्याची गरज
प्रवासी अनेक भागातून प्रवासासाठी येत आहेत. यात काही रेड झोनमधील प्रवासी आहेत. ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी बसचा वापर करत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने कोरोना संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
- प्रताप कच्छवे, प्रवाशी, परभणी
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT