Gajanan maharaj palkhi
Gajanan maharaj palkhi sakal
मराठवाडा

Gajanan maharaj palkhi : श्री गजानन महाराजांची पालखी हिंगोलीत दाखल;‘गणगण गणात बोते’चा गजर

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी सकाळी आठ वाजता हिंगोली जिल्ह्यातील वाढोणा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. ‘गणगण गणात बोते’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर पानकनेरगाव येथे पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यानंतर पानाचे विडे देण्यात आले. तेथून पालखी सेनगावकडे रवाना झाली.

संत गजानन महाराजांच्या पालखीत ७०० वारकरी सहभागी झाले आहेत. श्रीक्षेत्र शेगाव येथून ता. १३ जून रोजी प्रस्थान झाले आहे. रिसोडमार्गे पालखी सोहळा रविवारी सकाळी विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या वाढोणा (ता. सेनगाव) येथे पोचला. वाढोणा येथे पालखीची काही दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते पूजा करून स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

त्यानंतर ही पालखी पानकनेरगाव येथे आली. गावकऱ्यांनी पालखी मार्गावर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. त्या नंतर गावकऱ्यांच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. भोजनानंतर येथील श्री मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पानाचे विडे दिले. रविवारी सेनगावला पालखीचा मुक्काम होता. सोमवारी पालखी सोहळा नरसी नामदेव येथे येणार आहे. त्यानंतर केसापूर, लोहगाव दाटेगाव मार्गे डिग्रस कऱ्हाळे येथे पालखी मुक्कामी असणार आहे. डिग्रस येथे महाप्रसादासाठी दहा ते पंधरा हजारांपेक्षा अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

उद्या जवळा बाजार येथे मुक्काम

मंगळवारी (ता. २५) डिग्रस पाटी येथे कुंडकर पिंपरी येथील गावकऱ्यांच्या वतीने पालखीचे स्वागत करून चहा, फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ही पालखी औंढा नागनाथ येथे जाणार आहे. येथे पालखीचे स्वागत व भोजनाची व्यवस्था केली आहे. जवळा बाजार येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. येथे जैन परिवाराच्या वतीने स्वागत करून वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024: पावसाच्या सरींच्या साथीने अवघा वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल! दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर

Devendra Fadnavis: महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय? अजित पवारांच्या मंत्र्याला फडणवीसांचे भाजप प्रवेशाचे निमंत्रण

T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

Vidhan Sabha Election: महायुतीत कोणाला किती जागा? भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

INDIA: अयोध्या जिंकणारा खासदार ठरणार जायन्ट किलर? लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी 'इंडिया'चा मोठा डाव

SCROLL FOR NEXT