Gangapur Water Crisis Sakal
मराठवाडा

Gangapur Water Crisis : गंगापुरात ठणठणाट; नागरिकांना प्यावे लागते विकतचे पाणी

सकाळ वृत्तसेवा

गंगापूर : उन्हाची काहिली वाढत असतानाच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी नदीचा पाणीसाठा कमी झाला आहे. शहरातील बोअर, साठवण तलावानेदेखील तळ गाठला असून, आता शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून मागील काळात १७ कोटींची पाणी योजना ९ ते १० टक्के वाढीव दराने देऊनसुद्धा योजना योग्य रीतीने राबविली गेली नाही. त्याचप्रमाणे १ कोटी रुपयांचे वॉटरमीटरदेखील पाण्यासह गायब झाले आहे.

दरम्यान, दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम दुरुस्तीवर खर्च केली. एवढ्या पैशांमध्ये आणखी नवीन योजना कार्यान्वित झाली असती. मात्र, रस्त्याच्या कामात गुंतलेल्या नगरपालिकेला पाणीप्रश्न दिसला नाही. पावसाने दगा दिल्याने टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पाण्याच्या उपलब्धतेपेक्षा नियोजनाचा अभावच जास्त दिसून येतो. त्यामुळे दरवर्षी शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

रोगराई वाढण्याची शक्यता

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नगरपालिकेने गोदाकाठावरील अमळनेर येथे यंत्रणा उभारलेली आहे. दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतराची पाइपलाइन टाकण्यात आली असून, तेथून पाणी आणून शहरातील नादुरुस्त फिल्टर प्लांटमध्ये सोडले जाते.

नंतर हेच पाणी प्रक्रिया न करताच शहरातील जलकुंभांमध्ये चढवून लोकांना पाजले जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन रोगराई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नव्वद टक्के लोक खासगी फिल्टर प्लांटमधून २० ते ३० रुपये प्रति जारप्रमाणे पाणी घेऊन तहान भागवीत आहेत. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

प्रचंड गाळ साचल्याने तलाव उथळ

शहराच्या उत्तरेला मोठा साठवण तलाव आहे, परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्याने तलाव उथळ झालेला आहे. महसूल प्रशासनाच्या मदतीने नगरपालिकेने साठवण तलावातील गाळ काढला, तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो आणि या पाण्याचा गरजेच्या वेळी वापरदेखील करता येऊ शकतो.

गंगापूर शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती झालेली आहे. यासाठी प्रशासनाने सुयोग्य नियोजन केल्यास जास्तीत-जास्त शहरवासीयांना पाणी देता येईल. प्रशासनाने यात लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा.

— ज्ञानेश्वर साबणे, नगरसेवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT