Killari Earthquake 1993  sakal
मराठवाडा

Killari Earthquake 1993 : घर गेले दार गेले; नुसता नुसता वारा...

चार दिवस मला माझ्या कुटुंबातील माणसं सापडली नाहीत. चार दिवसांनंतर सापडले चौघांचे मृतदेहच. हसतं, खेळतं आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं.’

विश्वनाथ गुंजोटे

किल्लारी : ‘घर गेले दार गेले; नुसता-नुसताच वारा, कोण वेडी वेचत बसली आयुष्याच्या टिचल्या गारा’ ही प्रकाश होळकर यांची कविता म्हणजे येथील गौराबाई सातलिंग स्वामी यांचीच नव्हे तर अनेकांची आयुष्यगाथा आहे. ३० सप्टेंबर १९९३ ला झालेल्या भूकंपात गौराबाईंच्या कुटुंबातील चार व्यक्ती गेल्या.

डबडबलेल्या डोळ्यांनी गौराबाईंनी सांगत होत्या, ‘विघ्नहर्त्याला निरोप दिल्यानंतर पहाटे आमच्या गावावर, घरावर, परिसरावर मोठे विघ्न आले. ती रात्र काळरात्रच ठरली. साखरझोपेत माझ्या कुटुंबातील १२ सदस्य ढिगाऱ्या‍खाली अडकले. माझी एक मुलगी, दीर, जाऊ, सासुबाई चौघे डोळ्यांसमोर मातीआड गेले. रडून-रडून माझा घसा कोरडा पडला.

जे वाचले होते ते आपापली माणसे दगड, मातीतून शोधून काढत होते. सर्वत्र रडण्याचा, किंकाळण्याचा आवाज येत होता. रिमझिम पाऊसही सुरू होता. जणू आमचे दुःख पाहून ईश्वरच रडत आहे की काय, असे वाटत होते. चार दिवस मला माझ्या कुटुंबातील माणसं सापडली नाहीत. चार दिवसांनंतर सापडले चौघांचे मृतदेहच. हसतं, खेळतं आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं.’

मदतीसाठी आलेलेही रडत होते

खालून जमीन फाटली तर वरून आभाळ फाटले. कुणाचा नवरा, कुणाची बायको, कुणाचे मुलं, कुणाचे आई-वडील तर कुणाचे अख्खं कुटुंबच देवाघरी गेलं. हे बघून मदतीसाठी आलेली माणसंही रडत होती. ते दिवस आठवले तर अंगावर आजही शहारे येतात. माझा मोठा मुलगा सैन्यात होता. माहिती मिळताच तो त्याच्या सहकाऱ्यांसोबत किल्लारीला आला. त्याने येथे निवाऱ्याची सोय केली, असेही गौराबाईंनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT