लातूर : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी गेल्या सोमवारपासून येथे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. ७२ तासांच्या या आंदोलनाचे लोण राज्यात पोचेल अशी स्थिती निर्माण झाल्याने मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हेक्टरी दहा हजारांची मदत सरकारने घोषित केली आहे. ही मदत तोकडी असून शेतकऱ्यांची (Farmer) चेष्टाच आहे. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशारा माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी दिला. योग्य मदत न मिळाल्यास आगामी काळात रास्ता रोको, जेलभरो आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.येथील शिवाजी चौकात जिल्ह्यातील १२७ शेतकऱ्यांना (Latur) सोबत घेऊन निलंगेकरांनी ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाचा समारोप बुधवारी (ता.१३) झाला. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, सुरजितसिंह ठाकूर, मेघना बोर्डीकर, भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर आदी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार आदींनी ऑनलाइन मनोगत व्यक्त करीत आंदोलनाला पाठिंबा दिला. ज्येष्ठ शेतकऱ्याच्या हस्ते लिंबूपाणी घेत आंदोलनाची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शेतकऱ्यांना न्याय देण्याची शपथ घेण्यात आली. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. त्याचा त्यांना आता विसर पडल्याने एकरी केवळ चार हजार रुपयांची मदत घोषित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असे निलंगेकर म्हणाले.
मराठवाड्यातील मंत्र्यांवर टीका
सरकारमधील मराठवाड्यातील मंत्री आपली खुर्ची सांभाळत आहेत. शेतकरी अडचणीत असताना त्यांना काहीच देणे-घेणे नाही. त्यांनी पाठपुरावा करून मदत देण्यास सरकारला भाग पाडणे गरजेचे होते. मात्र या मंत्र्यांची हाताची घडी, तोंडावर बोट अशी स्थिती आहे. या मंत्र्यांच्या हाती आता भोपळा देण्याची वेळ आल्याचे निलंगेकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.