bhosikar.jpg 
मराठवाडा

लॉक डाऊनमुळे त्रस्त कुटुंबियांना धान्य वाटप

हफिज घडीवाला

कंधार, (जि.नांदेड) ः भुकेल्यांना अन्नदान करण्यासारखे पुण्य दुसऱ्या कशातही नसते. आपल्यामुळे भुकेल्यांच्या  पोटात दोन घास गेले, ही भावना माणसाला स्वर्गाचा आनंद देऊन जाते. नेमका हाच आनंद शुक्रवारी (ता.२७) भोसीकर कुटुंबीयांनी अनुभवला. लॉक डाऊनमुळे रोजगार गेलेल्या कुटुंबियांना जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या वर्षा भोसीकर यांनी धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे आदर्श ठेवला.

उदरनिर्वाह करणाऱ्यांची कोंडी
कोरोनाच्या पार्शवभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या मुळे छोटेमोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची कोंडी झाली आहे. लॉक डाऊन व संचारबंदी एक प्रकारे हातावर पोट असणाऱ्यांच्या मुळावर आली आहे. अनेकांना रोजगार मिळत नाही. सकाळी खाल्ले तर रात्रीचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाकडून यावर उपाययोजना केली जात असली तरी समाजातील दानशूर यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

हँडवाशचे वाटप
भोसीकर कुटुंबीय राजकारणासह सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर असते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वर्षा भोसीकर नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होतात. वाटरकप, स्वच्छताग्रह बांधकाम, कुपोषण मुक्ती आदी विविध उपक्रमात भोसीकर कुटुंबीय हिरीरीने भाग घेतो. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भोसीकरांनी यापूर्वी मास्क व हँडवाशचे वाटप करून खारीचा वाटा उचलला आहे. कोरोनामुळे छोटेमोठे व्यवसाय करून उपजीविका चालवणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यांना दोन घास उपलब्ध करून द्यावे या जाणिवेतून त्यांनी शुक्रवारी परिसरातील २५ कुटुंबियांना अन्नधान्य उपलब्ध करून दिले.

अडचणीचा डोंगर
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाने निराधारांना भोजन उपलब्ध करून देण्यासह इतर निर्णय घेतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन, संचारबंदी आवश्यक असले तरी यामुळे छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या समोर संकट उभे ठाकले आहे. व्यवसाय बंद पडल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. कंधारमध्ये हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. लॉक डाऊन आणि संचारबंदी त्यांच्या मुळावर आली आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्या पुढे अडचणीचा डोंगर उभा ठाकला आहे.

हेही वाचा - परदेशासह देशातुन आलेल्यांनी भरावा ‘हा’ फार्म
हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने भोसीकर कुटुंबीयांनी उचललेले पाऊल निश्चितच स्तुत्य आहे. २५ कुटुंबियांना धान्य उपलब्ध करून दिल्याने छोट्या व्यवसायिकांचा उपासमारीची प्रश्न सुटला असे नाही. यासाठी पुढाकार घेणे तेवढेच महत्वाचे आहे. २५ कुटुंबांना दिलासा देण्याचा एक छोटासा प्रयत्न यानिमित्ताने भोसीकर कुटुंबाने केला, हे येथे महत्वाचे आहे. समाजापुढे हा आदर्श आहे. कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे हातावर पोट असणारे अनेक कामगार बेरोजगार झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. यासाठी शासनाच्यावतीने सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT