परभणी : कोरोना विषाणुला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अवघे शहर रविवारी (ता.22) पूर्णपणे थांबले आहे.2004 च्या संचारबंदीनंतर प्रथमच शहराने एवढा सन्नाटा अनुभवला आहे.स्वयंस्फूर्तीने नागरी जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला असून कडकडीत बंद पाळण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र विविध उपाययोजना केल्या जात आहेत.त्याचा एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यात शनिवार पासून शटरडाऊन सुरु आहे.अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा, सुवीधा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवार पासून बंद आहे. रविवारी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली आहे.त्याची उत्सुकता होती.यामध्ये सर्व नागरीकांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतला.सकाळपासून अनेकांनी दारे-खिडक्या उघडल्या नव्हत्या. सर्व कॉलन्यात भयान शांतता पसरली आहे. लोक घरात बसुन टिव्हीवर बातम्यांचे आपडेट पाहताना दिसुन येत आहेत. एरवी रविवार म्हटले की,बच्चेकंपनीची घरोघरी किलबीलाट ऐकायला मिळत असतो. कॉलनीमधील मोकळी मैदाने,मंदीरासमोरील मैदानावर बच्चेकंपनी खेळताना दंगामस्ती करत असतात. आजच्या रविवारी मात्र हे चित्र नव्हते. मैदानावरच काय तर घरोघरी देखील भयानक शांतता आहे.
हेही वाचा - हिंगोली : कोरोना गो म्हणत रस्त्यावर शुकशुकाट
कित्येक वर्षानंतर दिवसा एवढी भयानक शांतता अनुभवला येत आहे
परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नारायण चाळ,गुजरी बाजार,क्रांती चौक,शिवाजी चौक,नानलपेठ या भागात शांतता होती.कधीच वर्दळ न हटणाऱ्या वसमत रस्त्यावर कित्येक वर्षानंतर दिवसा एवढी भयानक शांतता अनुभवला येत आहे. शहरात भल्या पहाटेच दुधविक्रेत्यांनी आपली सेवा बजावत सातच्या आत घरात जात कर्फ्यूत सहभाग घेतला. वसमत रस्त्यावरील काळी कमान,खानापूर फाटा या गजबजणाऱ्या भागात आजची असणारी शांतता बऱ्याच गोष्टी सांगुन गेली. शहरातील प्रत्येक कॉलनीत देखील रस्त्यावर चिटपाखरु दिसत नसल्याचे चित्र आहे.अगदी महिलांनी घराबाहेरील झाडझुड करण्याचे देखील टाळले.
सर्व वाहतूक बंद
रविवारच्या कर्फ्यूत एक नागरीक म्हणून प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा असल्याने रविवारी कोणीच घराबाहेर पडले नाही.बस सेवा पूर्णता: बंद ठेवण्यात आली. त्यामुळे सर्व बस या आगारात उभ्या राहील्या आहेत. तर रेल्वेने देखील बहुतांष गाड्या या रद्द केल्या आहेत. त्यामुळे बस आण रेल्वे स्थानकावर भयानक शांतता पसरली आहे...
पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त
शहरात जागोजागी पोलीसांचा बंदोबस्त असून वाहन दिसल्यास पोलीस वाहनधारककांची चौकशी करत आहेत. अत्यावश्यक असल्यास पुढे जाऊ दिले जात आहे. तसेच शहरातील जनता मार्केट, अपना कॉर्नर, दर्गा रोड भागात सातत्याने पोलीस फिरत आहेत.
येथे क्लिक करा - Video : पोलिसांकडून ‘कोरोना’ संदर्भात जनजागृती
मॉर्नींग वॉक बंद
सकाळी पायी फिरायला जाणारे देखील रविवारी दिसुन आले नाही. एरवी शहरातील उद्दाने, पोलीस मुख्यालय मैदान आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात सकाळी पायी फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते. मात्र रविवारी ही ठिकाणी सुनसान झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.