परभणी : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत जैन विद्यापीठ बेंगलोर, पंजाब विद्यापीठ चंदीगड, दिल्ली विद्यापीठ व एसआरएम विद्यापीठ चेन्नईच्या संघांनी आपआपल्या गटाचे विजेतेपद पटकावले. बुधवारी (ता.आठ) सायंकाळी बाद फेरीच्या उपउपांत्य फेरीच्या लढतींना सुरवात झाली असून उपांत्य व अंतिम फेरीचा सामना गुरुवारी (ता.नऊ) होणार असून त्यानंतर स्पर्धेचा समारोप होईल.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व येथील (कै.) सौ. कमलताई जामकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजीत पुरुष गटाच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत साखळी फेरीच्या सामन्यात गट विजेत्या व उपविजेत्या आठ संघांनी बाद फेरीत प्रवेश केला.
बेंगलोर, चंदिगड, दिल्ली, चेन्नई गट विजेते साखळी फेरीच्या ‘अ’ गटात पतियाळाच्या पंजाब विद्यापीठाने माघार घेतली. त्यामुळे बेंगलोर येथील जैन विद्यापीठाने आपले राजस्थान विद्यापीठ व मिथीला विद्यापीठासमवेतचे दोन्ही सामने जिंकुन गटाचे विजेतेपद पटकावले. तर राजस्थान दोन पैकी एक सामना जिंकून गटाचा उपविजेता ठरला.
हेही वाचा व पहा : Video : पोलिस उभारताहेत पेट्रोलपंप...!
‘ब’ गटात चंदिगडच्या पंजाब विद्यापीठाने आपले तिनही सामने जिंकून गटात विजेतेपद पटकावले. साखळी फेरीत चंदिगडने आंध्र विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ व जय नारायण व्यास विद्यापीठ संघांवर मात केली. गटाचे उपविजेतेपद विशाखापट्टनम येथील आंध्र विद्यापीठाने प्राप्त केले. संघाने आपल्या तीन पैकी दोन लढती जिंकल्या. कलकत्ता व जय नारायण व्यास विद्यापीठावर विजय प्राप्त केला तर पंजाब विद्यापीठा विरुध्द पराभव पत्कारावा लागला.
‘क’ गटात दिल्ली विद्यापीठाने सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कालिकत विद्यापीठ दिब्रुगढ विद्यापीठाचा पराभव करीत आपल्या तीनही लढती जिंकून गटाचे विजेतेपद पटकावले. तर उपविजेते कालिकत विद्यापीठाने पुणे विद्यापीठ व दिब्रुगड विद्यापीठावर मात करीत उपविजेतेपद पटकावले.
‘ड’ गटात चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठाने जौनपुर येथील व्हीबीएसपी विद्यापीठ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठ व रोहतकच्या एमडी विद्यापीठाचा पराभव करून गटविजेतेपद पटकावले. रोहतक या गटात उपविजेता ठरला. चारही गटातील विजेत्या व उपविजेत्या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. बाद फेरीतील उपउपांत्य फेरीच्या सामन्यांना सायंकाळी सुरुवात झाली. उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने गुरुवारी (ता.आठ) होणार आहेत.
हेही वाचा : Video : परभणीत विविध संघटनांची आंदोलन
गुरुवारी पारितोषिकाचे वितरण
जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी (ता.नऊ) दुपारी १२ वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. उध्दव भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव पाटील, उपाध्यक्ष किरण सुभेदार, रविंद्र पतंगे यांची उपस्थिती राहणार असून या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव विजय जामकर, प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.