Crime Sakal
मराठवाडा

८,३४,००० हजाराच्या गुटख्यासह १४,३३,००० हजाराचा मुद्देमाल जप्त

चोरट्या मार्गाने सुरु असलेल्या गुटखा व्यवसायावर पोलिस निरिक्षक शंकर पटवारी यांनी पोलिस अधिक्षक निखील पिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम राबविली.

जलील पठाण.

चोरट्या मार्गाने सुरु असलेल्या गुटखा व्यवसायावर पोलिस निरिक्षक शंकर पटवारी यांनी पोलिस अधिक्षक निखील पिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम राबविली.

औसा (जि.लातूर) - औसा शहरात (Ausa City) चोरट्या मार्गाने सुरु असलेल्या गुटखा व्यवसायावर पोलिस निरिक्षक शंकर पटवारी यांनी पोलिस अधिक्षक निखील पिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम (Campaign) राबविली. असुन, या मोहीमे अंतर्गत शुक्रवारी (ता. ४) रात्री एक वाजता गुटखा वाहतुक करणारी स्कार्पिओची तपासणी केली असता त्यात आठ लाख रुपयांचा गुटखा (Gutkha) व तत्सम पदार्थ आढळून आले. तर सहा लाखाची स्कॉर्पिओसह चौदा लाख तेहतीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या (Police) हाती लागला. या प्रकरणी औसा पोलिसांनी बिलाल ईस्माईल शेख (वय ३४ वर्षे) रा. खोरी गल्ली लातूर याच्या विरोधात गुन्हा (Crime) नोंद केला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीवरुन बिलाल शेख हा त्याच्या ताब्यात असलेल्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम.एच. २४-ए.एफ. ०५४८ मध्ये गुटखा व अन्य तत्सम पदार्थ घेऊन शुक्रवारी (ता.४) रात्री आला होता. पोलिस निरिक्षक शंकर पटवारी यांना या बाबत गु्प्त माहीती मिळाल्याने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना या बाबत सुचना दिल्या होत्या.

सदर गाडीची तपासणी पोलिसांनी केली असता यामध्ये आरएमडी पान मसालाचे दोन बॉक्स किंमत ४८ हजार, बाबा ब्लॅक सुगंधी जर्दा- ८ बॉक्स- १ लाख ६८ हजार, बाबा नवरत्न सुगंधी पान मसाला एक बॉक्स- २१ हजार, बाबा नवरत्न सुगंधी पान मसाला ४ बॉक्स (१००ग्रॅम पॅकिंग) ८४ हजार, रजनीगंधा पान मसाला- ५ बॉक्स- १ लाख ५५ हजार, रजनीगंधा पान मसाला (१००ग्रॅम पॅकिंग) ८ बॉक्स- ३ लाख २८ हजार, बाबा १५४- ५ बॉक्स- पाच हजार, बाबा १२०- चार बॉक्स-१२ हजार, बाबा १६०- चार बॉक्स- १२ हजार असा ८ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा गुटखा व वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी अंदाजे किंमत सहा लाख रुपये असा एकून मुद्देमाल चौदा लाख तेहतीस हजार औसा पोलिसांनी जप्त केला.

अन्न व औषध प्रशासनाला कळविलेल्या माहीतीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी नसरीन मुजावर यांनी मंगळवारी (ता. ८) जप्त मालाचे नमुने काढून त्याचा पंचनामा केला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक निलम घोरपडे ह्या करीत आहेत. औसा पोलिसांच्या या मोहीमेने गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली असुन गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पोलिस निरिक्षक शंकर पटवारी यांनी सांगीतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT