अंबाजोगाई : शहर परिसरातील ऐतिहासिक ठेवा असलेला हत्तीखान्यातील (जोगाई सभामंडप) लेण्यांचे जतन व दुरुस्तीसाठी राज्य शासनाने २ कोटी ४९ लाख ८४ हजार रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या बाबतचे परिपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सोमवारी (ता.५) जाहीर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे (ता.१६) सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाची विशेष बैठकीत मराठवाड्यातील प्रलंबित विकास कामाबाबत चर्चा होऊन निर्णय झाला होता. त्यात मराठवाड्यासह अंबाजोगाई येथील प्राचीन वास्तुस्थळाचा विकास करण्याबाबत घोषणा करण्यात आली होती.
या निर्णयानुसार अंबाजोगाई परिसरातील जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरुस्तीचा येथील परिचय आर्किटेक्ट यांनी तयार केलेले अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेकरीता पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडे सादर केले होते. त्यानुसार या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
या प्रस्तावानुसार जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्तीच्या कामास दोन कोटी ४९ लाख ८४ हजार ४६५ रुपये इतक्या निधीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित केले असून, पुरातत्वीय निकषानुसार याचे काम पूर्ण होईल. याची जबाबदारी संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय व संबंधित संवर्धन वास्तुविशारद यांची राहील. असे या आदेशात म्हटले आहे.
भूचरनाथचे झाले जोगाई सभामंडप
अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस यादवांच्या काळात कोरलेल्या या लेण्यांना प्राचीन इतिहासात भूचरनाथ मंदिर असा उल्लेख आहे. योगेश्वरी महात्म्यामध्ये तसा उल्लेख आहे. या ठिकाणी चारही बाजूंनी लेण्यांच्या बाहेर खडकात कोरलेले मोठे हत्ती असल्याने त्यास हत्तीखाना असे नाव प्रचलित झाले. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने काढलेल्या आदेशात याचे नामकरण जोगाई सभामंडप (हत्तीखाना) असे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.