परळी वैजनाथ - शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘व्हायरल इन्फेक्शन’ची साथ पसरली असून, यात डेंगीनेही डोकेवर काढले आहे. लहान मुलांचे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने धूर फवारणीसाठी खरेदी केलेल्या मशिन एक-दोन दिवसांच्या वापरानंतर धुळखात पडल्या आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यात अनेक साथीचे आजार पसरतात. यामुळे घर व परिसरात स्वच्छता ठेवणे, धूर फवारणी करणे गरजेचे असते. यासाठी मागच्या महिन्यात नगरपालिकेने अत्याधुनिक पध्दतीच्या ३० फाँगींग मशिन खरेदी केल्या आहेत.
खरेदी केल्यानंतर काही दिवस नगरपालिकेच्या वतीने धूर फवारणीही केली गेली. यंदा पाऊस पडत नाही. कधी आभाळ तरी कधी ऊन, रिमझिम असे अधूनमधून सुरू आहे.
यामुळे शहरात सध्या व्हायरल इन्फेक्शन व डेंग्यूची साथ सुरू झाली आहे. यात लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडताना दिसून येत आहेत. तसेच सर्दी, खोकला याचेही रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. या आजारावर उपचार करण्यासाठी सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढली आहे.
नगरपालिकेने ज्या अत्याधुनिक फाँगींग मशिन आणल्या आहेत, त्यांचा वापर करुन शहरात सातत्याने धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
डेंगीची लक्षणे
डेंगीची लागण झाल्यास सुरवातीला ताप आणि अंगदुखी होते. अचानक थंडी वाजून ताप येणे, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीद्वारे रक्त येणे, सतत तहान लागणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात.
वेळीच उपचार मिळाल्यास डेंगीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार म्हणजे ताप किंवा अंगदुखी पाहून तशी औषधे दिली जातात. जर, प्रकृती गंभीर असेल तर रुग्णालयात भरती करावे लागू शकते. डेंग्यूच्या रुग्णाला विश्रांतीची सर्वांत जास्त गरज असते. तसेच भरपूर पाणी पिण्याचीही, म्हणजे अंदाजे दिवसाला तीन लिटर पाणी प्यायला हवे. तसेच रुग्णाने साधा आहार घ्यावा, डेंग्यू तापामुळे शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते. साधारणपणे डेंग्यूचा रुग्ण ३ ते ८ दिवसांत बरा होतडॉ.
गुरुप्रसाद देशपांडे, बालरोग तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.