नांदेड : नांदेड शहर म्हटले की डोळ्यासमोर येते शीख बांधवांचे धार्मिक स्थळ तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये मत्था टेकण्यासाठी अनेक नागरिक पंजाब आणि हरियाणासह विदेशातुन येत असतात. देशात ता. २३ मार्च नंतर लॉकडाऊन झाल्याने नांदेडमध्ये आलेल्या नागरिकांची सोय केली. यामध्ये तीन हजार सातशे पंचावन्न नागरिकांची सोय गुरुद्वारा बोर्ड आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.
हेही वाचा.....तुळजाभवानी मंदिर समिती हजारो कुटुंबांना करणार मदत
आरोग्य विभागाकडून काळजी
सर्व संगत मधील यात्रेकरुंचे जवळपास तीन हजार ७५५ जणांची आरोग्य तपासणी नांदेड महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने केली. प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी तीन दिवस सलग चार टीम काम करीत होत्या. यासाठी ताप तपासणीसाठी थर्मलगनचा वापर करण्यात आला होता. यात्रेकरुंची आरोग्य तपासणी करून तसेच महानगरपालिकेच्या क्षेत्रात आठ हजार तीनशे पंचावन्न नागरिकांना शहरी भागात घरीच विलगिकरण करण्यात आले आहे. त्यांची दैनंदिन भेट देवून आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी विषयी घरोघरी जाऊन विचारपूस केली जात आहे.
हेही वाचलेच पाहिजे.....नागरिकांना घरपोच मिळतो भाजीपाला
१३० परदेशी नागरीक
नांदेड शहरात अनेक परदेशी नागरिकांना देखील विलगिकरण करण्यात आले असून यामध्ये १३० नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी केली असून याबरोबरच नांदेड महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांनी कोरोणाच्या संसर्गाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनाची जाणीव जागृती करण्याचे काम नांदेड आरोग्य यंत्रणा करीत आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंग बिसेन यांनी दिली.
आरोग्य विषयक काळजी
कोरोनाचा संसर्ग हा जगासमोरील आताची सर्वात मोठी आपत्ती आहे पण देश आणि राज्य पातळीवर प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणा सतर्कतेने काम करताना दिसते आहे. नांदेड जिल्ह्याने आरोग्यविषयक काळजी आणि त्याप्रमाणे उपाय योजना केल्यामुळे आतापर्यंत नियंत्रण मिळवले आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयाने आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य यंत्रणेने काम केल्याने सर्व परीचरिका, आशा कार्यकर्त्या, डॉक्टर यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात
कोरोनाच्या संसर्गाच्या बाबतीत आजपर्यंत परिस्थिती नियंत्रणात असून पॉझिटीव्ह रुग्ण - शून्य आहे. आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन असणारे ४६१ जण होते. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले १२२ आहेत. यातील अजून ३१ जणं निरीक्षणाखाली आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये एक जणाला करण्यात आले आहे. घरीच क्वारंटाईनमध्ये असलेलेची संख्या ४६० आहे. आज तीन तपासणीसाठी नमुने घेतले आहेत. एकूण १९९ नमुने तपासणी केले गेले आहेत. यातील १८७ निगेटीव्ह आले आहेत आणि सात नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. नाकारण्यात आलेले नमुने पाच आहेत. जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ७२ हजार ९८ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. असे आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे.
- मीरा ढास,
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.