Heavy Rain crop Damage Compensation Sakal
मराठवाडा

शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसांत मदत

अतिवृष्टीची भरपाई : १ हजार ८ कोटी ३० लाखांचा निधी प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : यंदा पावसाने मराठवाड्यात सरासरी ओलांडली. अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी आणि शंखी गोगलगायीच्या पिकांवरील प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन्हीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी मराठवाड्यासाठी १ हजार ८ कोटी ३० लाख ८१ हजार रुपयांचे अनुदान मंगळवारी (ता. २०) विभागीय आयुक्तालयातून वितरित करण्यात आले. येत्या आठ दिवसांत संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटाला मराठवाड्यातील शेती सामोरी जात आहे. सलग चौथ्या वर्षी मराठवाड्यात खरीप हंगाम हातून गेला आहे. अतिवृष्टीमुळे तब्बल ११ लाख ७८ हजार ३७० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे.

इतक्या शेतकऱ्यांचे पिकाचे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे. याशिवाय गोगलगाय आणि सततच्या पावसामुळेही विभागात सुमारे पावणेपाच लाख शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या संकटातून शेतकरी सावरला पाहिजे यासाठी यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफच्या जुन्या दरापेक्षा दुपटीने मदत देण्याचे जाहीर केले. शिवाय पूर्वी २ हेक्टरपर्यंत देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये यंदा वाढ करून ३ हेक्टरपर्यंत क्षेत्र वाढविण्यात आले आहे.

औरंगाबाद, बीड सध्या वगळले

मदतीचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील कार्यालयांच्या बीडीएसवर जमा होईल. त्यानंतर तो बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची नोंद नसल्याने मदतीमधून सध्या हे दोन जिल्हे वगळण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT