Marathwada Weathe sakal
मराठवाडा

Marathwada Weather : मराठवाड्यात पावसाचा तडाखा

गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाल्यावर मंगळवारी दुपारनंतर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मराठवाड्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. ज्वारी, हळद आणि आंब्यासह अन्य पिकांना या पावसाचा तडाखा बसला.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाल्यावर मंगळवारी दुपारनंतर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मराठवाड्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. ज्वारी, हळद आणि आंब्यासह अन्य पिकांना या पावसाचा तडाखा बसला. नांदेड शहरासह जिल्ह्यात सायंकाळी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत तारांबळ उडाली. नांदेड तालुक्यातील मरळक, लिंबगाव, विष्णुपुरी, कुरुळा, फुलवळ, मानसपुरी (ता. कंधार), लोहा तालुक्यातील मारतळ्यासह परिसर, बरबडा (ता. नायगाव), अर्धापूरमध्ये पाऊस झाला. भोकरला हलक्या सरी पडल्या. या पावसामुळे उन्हाळी ज्वारी, भुईमूग, शिजवून वाळत ठेवलेल्या हळदीसह आंब्याचे नुकसान झाले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यासाठी आठ ते १२ एप्रिलदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे.

हिंगोलीत मेघगर्जना

हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आजही ते कायम होते, वाराही सुटला होता. सायंकाळी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्यासह हिंगोली शहरासह तालुक्यातील खांबाळा, अंधारवाडी, कारवाडी, बळसोंड, पिंपळखुटा, बासंबा, सिरसम, भांडेगाव, नवलगव्हाण, साटंबा, सवड, राहोली व लिंबाळा आदी ठिकाणी पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, तोंडापूर, सुकळीवीर, बाळापूर, डोंगरगाव, चिखली, येगाव, शेवाळा, बोल्डा, पोतरा, असोला, म्हैसगव्हाण, वसमत तालुक्यातील गिरगाव, परजना, खाजमापूर वाडी, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द, मुरुंबा, माळवटा, कुरुंदा व हयातनगर आदी ठिकाणी पाऊस झाला. मेघगर्जना, विजांचा कडकडाट उशिरापर्यंत सुरू होता. हिंगोली शहरातील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला होता.

ज्वारीचे पीक आडवे

परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. गंगाखेड, राणी सावरगाव, लिमला (ता. पूर्णा), मानवत, सेलू, देवगाव फाटा (ता. सेलू), ताडकळस, (ता. पूर्णा), माटेगाव (ता. पूर्णा), पालम, जिंतूर, बोरी (ता. जिंतूर) या परिसरात पाऊस झाला. माखणी (ता. पूर्णा) येथे काही झाडे उन्मळली. लिमला शिवारात ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले.

आंब्यांचे नुकसान

अंबाजोगाई (जि. बीड) शहर व तालुक्यात दुपारपर्यंत उन्हाचा कडाका होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास आभाळ दाटले आणि वादळी वारे सुरू झाले. मध्येच कानठळ्या बसविणारी वीज कडाडली. शहरात दहा ते २० मिनिटे, तर तालुक्यातील पोखरी परिसरात अर्धा तास पाऊस झाला. सायगाव, नांदगाव, घाटनांदूर भागांतही पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वारा व अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान झाले. ठिकठिकाणी गावरान आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला होता. खोडव्या उसाला मात्र या पावसाचा आधार मिळाल्याची माहिती कृषी तंत्र समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात हजेरी

लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जळकोट तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. निलंगा येथे पावसाचा शिडकावा झाला. वादळवाऱ्यामुळे जळकोट तालुक्यात पिकांचे नुकसान झाले, आंब्यालाही फटका बसला. वाऱ्यामुळे काही विद्युतखांबही आडवे झाल्याने वीजपुरवठा विस्कळित झाला होता. कळंब (जि. धाराशिव) शहर व परिसरात पंधरा मिनिटे बऱ्यापैकी पाऊस झाला.

विदर्भाला फटका

पुणे : विदर्भात मंगळवारी (ता. १०) सकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू ,संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली. पश्चिम विदर्भात अवकाळीने धुमाकूळ घालत गहू, लिंबू, आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले. खामगाव तालुक्यात गारपीट झाली.

पूर्व विदर्भातील ब्रम्हपूरी (चंद्रपूर), अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत सोमवारी (ता.८) रात्री पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात गारपीट झाल्याने संत्रा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. वरुड, मोर्शी या भागांत मंगळवारी (ता.९) पहाटे गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. त्याचा मोठा फटका संत्रा बागायतदारांना बसला. वरुड तालुक्‍यातील वघाळ, वाडेगाव, लोणी, शिंगोरी, इत्तमगाव, वंडली, वडाळा, नांदगाव, गाडेगाव, हातुर्णा या भागांसह इतरही अनेक गावे बाधित झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यात पावसाने भुईमूग पिकाचे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यातही तुरळक पावसाने हजेरी लावली.

हिंगोली : शहरात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी.

अंबाजोगाई : शहरातील मोंढा भागात मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस.

परभणी : लिमला परिसरात अवकाळी पावसाने आडवे झालेले ज्वारीचे पीक.

हळद जपण्यासाठी धावपळ

मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यांतील अनेक गावांत सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे वाळत घातलेली हळद झाकून ठेव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT