Rain Water in Home sakal
मराठवाडा

Murud Rain : मुरुडमध्ये अतिवृष्टी! दुकान व घरात पाणी शिरले, मंदिर कोसळले, मोटारही गेली वाहून...

मुरुड शहरात सायंकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहरातील काही भागात घरामध्ये पाणी शिरले असून बाजारातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुरुड - शहरात सायंकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहरातील काही भागात घरामध्ये पाणी शिरले असून बाजारातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. मोदी नगर भागातील नरसोबाच्या मंदिराचा मागील भाग कोसळला आहे. तर मुरुड पाडोळी रोडवरील मुरुडा नदीवरील पुलावरून स्विफ्ट डिझायर गाडी वाहून गेली आहे. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

आज सकाळपासूनच आभाळ दाटून आलेले होते. सायंकाळी पाच वाजता दमदार पावसास विजेच्या कडकडाटासह सुरुवात झाली. सलग तीन चार तास झालेल्या मोठ्या पावसामुळे पाडोळी रोडवरील बाजारपेठेतील काही दुकानात पाणी शिरले. आंबीलपुरे फुटवेअर या दुकानात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले. जुन्या पोस्ट ऑफिस जवळील फुलांची दुकाने व काही छोट्या दुकानातील पाणी शिरले आहे.

तसेच अचानक आलेले पाणी नालीतून वाहून न गेल्यामुळे दंडे व गाडे यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. स्वराज कॉलनी भागातील काही भागातील पाणी शिरले आहे. बऱ्याच वर्षानंतर दत्तनगर भागात असलेल्या एकाच पावसाने पूर्ण भरला आहे. तलावाच्या जवळ असणाऱ्या वस्तीतील काही भागात पाणी शिरले आहे.

मुरुड पाडोळी रोडवरील मुरुडा नदीवरील पुलावरून स्विफ्ट डिझायर गाडी वाहून गेली आहे. प्रसंगावधान ता दाखवत चालक बाहेर आल्याने जीवित हानी झाली नाही. अद्याप पावसाचा जोर कायम असून असाच पाऊस राहिल्यास नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT