harshal 
मराठवाडा

युवकाने मदतीतून श्रमजिवी लोकांचा स्वाभिमानही जपला, कुठे ते वाचा... 

गणेश पांडे

परभणी ः ‘कोरोना’च्या काळात टाळेबंदीमुळे लोकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत ग्रामीण लोकांचे पुरते हाल होत आहेत. ग्रामीण भागातील लोकांची निकड ओळखून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाने जन्मगावाकडील ग्रामस्थांना मदतीचा हात देऊन माणुसकी जपली आहे. आपल्या माणसासाठी त्यांची ही तळमळ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

सध्या ‘कोरोना’च्या महामारीमुळे हातावर पोट असणाऱ्या शेकडो श्रमजिवी कुटुंबांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे संपूर्ण कुटुंबांची परवड होत आहे. काही निराधारांना तर अत्यावश्यक औषधींसाठी पैसे नसल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

औषधी- गोळ्यांसाठी आर्थिक मदत
या सर्व गोष्टींचे सामाजिक भान ठेवत रामपुरीचे भूमिपुत्र व पुण्यात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत असणारे हर्षल यादव यांनी आपले दोन महिन्यांचे मानधन परभणी शहर, रामपुरी, वझूर, हटकरवडी व पंचक्रोशीतील गावांच्या गरजू लोकांसाठी समर्पित केले. यात त्यांनी जीवनावश्यक १२ गोष्टींची किट आणि औषधी- गोळ्यांसाठी आर्थिक मदत गरजूंना देऊ केली. राज्य सरकारने ऊसतोड कामगारांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिली. हे ऊसतोड कामगार गावी आल्यानंतर किमान १५ दिवस विलगीकरणामध्ये राहण्याचे ठरले. त्यात आधीच महिनाभर हाताला काही काम नसताना गावात येऊन उपासमारीची वेळ या कामगारांवर आली.

श्रमजिवी लोकांचा स्वाभिमानही जपला
आजूबाजूच्या गावांतील या कामगारांची यादी करून हर्षल यादव यांनी ऊसतोड कामगारांना ही मदत देऊ केली. जेणेकरून त्यांना उपासमारीमुळे विलगीकरणामधून निघून गावात येण्याची गरज पडू नये. चुकून ही गावकऱ्यांच्या आरोग्याला हानी पोचू नये. हे करत असतानाच त्यांनी परभणीचे भूमिपुत्र व बाहेर पुण्या, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये काम करत असणारे त्यांचे मित्र व ओळखीच्या लोकांनाही त्यांच्या त्यांच्या राहत्या भागांमध्ये गरजू लोकांना मदत करण्यासाठी प्रेरणा दिली. विशेष म्हणजे हे करताना त्यांनी कुठलीही जाहिरात किंवा फोटोबाजी न करता परिस्थितीमुळे ग्रासलेल्या श्रमजिवी लोकांचा स्वाभिमानही जपला. 

निराधार लोकांच्या चेहऱ्यावर समाधान
ही मदत वाटताना त्यावर फक्त कोरोना आपत्कालीन अन्नधान्याची मदत, निराधाराला आधार, जनसेवा हीच ईश्वरसेवा, जय हिंद! असा मजकूर लिहिला आहे. या आधाराने निराधार लोकांच्या चेहऱ्यावर त्यांनी समाधान फुलविले. या सर्व उपक्रमात सोशल डिस्टसिंग पाळत मदत करण्यात आली. उपक्रमात रामपुरी येथील साहेबराव यादव, बालासाहेब यादव, कृष्णा यादव तसेच वझूर, हटकरवडी, साखरेवडी येथील प्रतिष्ठित नागरिक, पोलिस पाटील, सरपंच यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Assembly Election 2024 Result : देवेंद्र फडणवीस अभिमन्यू पवारांना मंत्री करणार; औसेकरांना विश्वास

Jalgaon Assembly Election 2024 Result : ब्रेक के बाद...गुलाबरावांची ‘हॅट्ट्रिक’; ‘जळगाव ग्रामीण’मधून 59 हजारांचे मताधिक्य

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

IPL 2025 Auction Live: मोहम्मद सिराजसाठी बंगळुरूने RTM चा पर्याय नाकारला अन् सिराज गुजरातमध्ये दाखल झाला

Latest Maharashtra News Updates : रांचीतील राजभवनाबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखवली एकजूट, सरकार स्थापनेचा दावा

SCROLL FOR NEXT