फोटो 
मराठवाडा

ऐरणीच्या देवा तुला...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पुस्तक मागतात टेबल - खुर्ची..त्याशिवाय मेंदुची मशागत नाही होत. या जाणिवेला धडावेगळे करुन अभ्यासाला धाकात ठेवणारी ही चिमुरडी. पालभर पसरलेल्या पसाऱ्यात ऐरणीवर तिन छान पसरुन ठेवले जातीवंत जीगर. घणाला सांगाव लागत नाही..तिच्या घणाघाती जगण्याची कुळकथा.. लोक म्हणतात आता घणापेक्षा तिच्या हातातील पेन लिहून ठेवणार आहे तिच्या सुंदर जगण्याची कथा...

जन्मत: अठराविश्‍व दारिद्र्य कपाळी असलेल्या पालावरील जीवन जगणाऱ्यांचे आयुष्य काही वेगळे असते. त्यांना समाजात कुठलाच चांगला स्तर स्विकारु शकत नाही. गावकुसाच्या बाहेर आपले पाल टाकून मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह सांभाळणारे अनेकजण आहेत. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, लोहा, हियामतनगर, मुदखेड किंवा नांदेड शहरातही पाल टाकून रस्त्यावर आपला संसार थाटतात. हाताला मिळेल ते काम करून रात्री आपल्या परिवारासोबत सुखी जीवन जगता. 

श्रीमंत वर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात रस्त्याच्या कडेला पाल टाकून लोहार समाज आपला व्यवसाय करतात. त्यांनाही आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे असे वाटते. परंतु ते सध्याच्या या महागड्या शिक्षण क्षेत्रात येऊ शकत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या येणाऱ्या पिढीवर पडतो. मात्र अभ्यासाची इच्छा असलेला विद्यार्थी सर्व परिस्थितीवर मात करून अभ्यास करु शकतो. हे या चिमुकलीने समाजाच्या व श्रीमंत वर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. घण ज्या ठिकाणी लोहार मारतो त्या ऐरणीलाच आपला टेबल समजून अभ्यासात मग्न असलेल्या या चिमुकलीचा फोटो टिपला आहे ते येथील छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी. त्यांच्या कॅमेरातून आलेला हा फोटो खऱ्या अर्थाने महागडे शिक्षण घेणाऱ्यांना आहे. 

हिमायतनगरमध्येही पालांची संख्या जास्त

नुकताच हिमायतनगर येथील एका पालावर राहणारा युवक उच्च शिक्षीत झाला. त्याचा आदर्श आज समाजासमोर आहेत. ज्या प्रमाणे हिरा हा कोळशाच्या खाणीत राहतो. परंतु आपली चमकता तो कधीच विसरत नाही. त्यानुसार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेंदुची मशागत करण्यासाठी फक्त टेबल किंवा खुर्ची लागत नाही तर तो कुठल्याही परिस्थितीत समाधान मानुन अभ्यास करतो. समाजात असेअनेक उत्तम उदाहरणे आहे. पालामध्ये राहून आपला कसाबसा संसाराचा गाडा हाकणारा माणूसही आपल्या येणाऱ्या पिढीच्या नशिबी अठरा विश्‍व दारिद्र्य येऊ नये म्हणून आज तो आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या शाळेत पाठवतो. 

चिमुकलीचा आदर्श 

अभ्यासात मग्न असलेल्या या चिमुकलीचा आदर्श नक्कीच सर्व सोयीसुविधा असलेल्या विद्यार्थ्यांनी जर घेतला तर नक्कीच यश मिळते. अशा या होतकरु व गरीब अभ्यासु मुलांचे पुनर्वसन झाल्यास ते समाजाच्या हिताचे काम होईल अशी भावना या निमित्ताने व्यक्त केल्या जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT