नांदेड : एका कार्यक्रमातील डीजेच्या आवाजास प्रतिबंध घालणाऱ्या फौजदारासह कर्तव्यावर हजर असलेल्या एका गृहरक्षक दलाच्या जवानास धक्काबुक्की व मारहाण केली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात २० जणांविरुध्द सोमवारी (ता. २३) डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ही प्रकार शनिवारी (ता. २१) रात्री नऊच्या सुमारास नुरीचौक परिसरात घडला.
देगलूर नाका परिसरातील नुरी चौक भागात एका कार्यक्रमात डीजे लावून त्याद्वारे परिसरात कर्कश आवाज होत असल्याचा प्रकार विमानतळ पोलिसांच्या कानी पडला. पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी आपले सहकारी अधिकारी महेशकुमार ठाकुर यांना काही कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी पाठविले. श्री. ठाकूर हे त्या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या एका गृहरक्षक दलाच्या जवानाला त्या डीजे बंद करण्यास सांगायला पाठविले. मस्तीत मग्न असलेल्या येतील जमावाने होमगार्डला त्या ठिकाणाहून हाकलले. त्यानंतर पुन्हा फौजदार श्री. ठाकूर हे स्वत: पुढे आले. डीजे बंद करण्याच्या सर्वप्रथम सुचना दिल्या. मात्र ही मंडळी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे श्री. ठाकूर यांनी काही जणांना खाकीचा धाक दाखविला. आम्ही कोणाचेच ऐकणार नाही म्हणून जमावाने फौजदार ठाकूर व होमगार्ड योगेश वराडे यांना धक्काबुक्की करून मारहाण केली.
हेही वाचा --‘या’ शिक्षणसंस्थेत मुली भयभीत...का? वाचा..
वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी
यानंतर हे प्रकरण ठाणे, व उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत पोचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संजय ननवरे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी या ठिकाणाहून काही जणाना ताब्यात घेऊन संयम राखत काढता पाय घेतला.
यांच्याविरुध्द गुन्हा दाखल
त्यानंतर ठाण्यात येऊन फौजदार महेशकुमार ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन शासकिय कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी अब्बु उर्फ अरबाज पठाण, शेख मोईन शेख महमद, शेख रियाज, शेख इस्माईल, शेख मुस्ताक, शेख सलीम उर्फ चालु, शेख फिरोज उर्फ पिरु, मोहसिन महंमद, इम्राण उर्फ इमु यांच्यासह इतर १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जाधव करीत आहेत.
येथे क्लीक करा-- अशोक चव्हाण यांना मिळणार मंत्रीमंडळात स्थान
आरोपींना सोडणार नाही.
दिवसेंदिवस पोलिसांवर कर्तव्य पार पाडताना काही समाजकंटकांकडून हल्ले होत आहेत. ही गंभीर बाब असून गुन्हेगारांनी पोलिसांचा संयम पाहू नये. असे हल्लेखोरांना त्यांची जागा दाखवून देणार असा सज्जड इशारा दिला.
विजयकुमार मगर, पोलिस अधिक्षक, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.