मुख्यमंत्री शिंदे  sakal
मराठवाडा

Hingoli : पैनगंगा, पूर्णा, कयाधू काठावर आता अबादानी

वरदान ठरणाऱ्या २३ प्रकल्पांना मुख्यमंत्री शिंदे यांची मान्यता

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आहे. पण, आता हिंगोली जिल्‍ह्यासह नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा, पूर्णा आणि कयाधू नद्यांवरील २३ बंधारे आणि विदर्भ-मराठवाड्यातील नद्यांना जोडणाऱ्या १६ पुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्या आधारे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुरुवारी (ता. १२) झालेल्या बैठकीत. बंधारे आणि पुलांना मान्यता देण्यात आली.

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण ते निम्म पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रापर्यंत एकूण सात बंधारे प्रस्तावित आहेत. हे सात बंधारे पूर्ण झाल्यास १० हजार ६१० हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली येण्यास मदत होणार आहे. यामुळे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सातत्याने टंचाईग्रस्त असणाऱ्या आदिवासी तालुक्याचा सिंचनाचा व दोन्ही जिल्ह्यातील १०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाला एक महिन्यात राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मान्यता देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले. यासाठी एक हजार ६०० कोटी रुपये खर्च होणार असून, प्रति वर्षी ५०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. याचा फायदा मराठवाड्यातील कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या भागासह विदर्भातील पुसद, उमरखेड, महागाव यातालुक्यांना होणार आहे.

पूर्णा नदीवर पोटा, जोडपरळी, पिंपळगाव कुटे, ममदापूर याठिकाणी चार बंधारे बांधण्यास तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्याचा हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनेक गावांना फायदा होणार आहे. त्यामुळे ५६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कयाधू नदीवर १२ बंधारे प्रस्तावित असून त्यापैकी सुमारे नऊ बंधाऱ्यांचे जलसंधारण विभागामार्फत काम करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या या बैठकीत या प्रकल्पांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

विदर्भ मराठवाडा सेतू अंतर्गत १६ पुलांच्या कामांना मान्यता देण्यात आली. यामुळे यवतमाळ, नांदेड व हिंगोली हे जिल्हे जोडले जाणार आहेत. याभागातील ऊस, हळद उत्पादक शेतकऱ्यांना या पुलांमुळे किमान ४० किमी फेरा वाचणार आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहणार आहेत.

- हेमंत पाटील, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT