file photo 
मराठवाडा

हिंगोली : जलेश्वर तलावाच्या विकास आराखड्यासाठी ८५ कोटीचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहराच्या मध्यभागी असलेला पुरातनकालीन जलेश्वर तलावाच्या विकासासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पुढाकार घेतला असून या तलावासह परिसराच्या विकास आराखड्याला अंतीम स्वरुप देण्यात आले असताना हा आराखडा ८५ कोटी रुपयांचा झाला आहे. आराखड्यावर शेवटचा हात फिरविण्यात आला आहे.

हिंगोली शहराच्या मध्यभागी असलेल्या जलेश्वर तलावासह परिसरातील विकासाकरीता ८५ कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव राज्य व केंद्रशासनाकडे पाठविला जाणार आहे. विशेष म्हणजे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जलेश्वर तलावाच्या विकासासाठी मागणी केली होती. जलेश्वर तलावाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. या ठिकाणी उद्यानही निर्माण केले जाणार असून त्यामध्ये बच्चे कंपनीसाठी खेळणीही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

तसेच या भागातील रस्तेही विकास आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तलावात दुषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे सदर पाणी शुद्ध करण्यासाठी प्रकल्पाचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या विकास आराखड्यावर शेवटचा हात फिरविण्यात आला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, प्रशासन अधिकारी रामदास पाटील नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, वास्तू विशारद विवेक देशपांडे यांची उपस्थिती होती. दरम्यान, जलेश्वर तलावाच्या शुशोभिकरणामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Blast: लेबनानमध्ये बॉम्बस्फोट, इराणच्या राजदूतासह एक हजार जण जखमी, खिशात ठेवलेल्या पेजर्सने...

Indapur Crime : इंदापूर शहरात दोन चारचाकी वाहनातून स्टंटबाजी करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Vadigodri News : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे अंतरवालीत उपोषण करण्यावर ठाम

Kolkata Murder Case: 'विकिपीडिया'ला सुप्रीम कोर्टाचे आदेश! कोलकाता घटनेतील पीडितेचे नाव अन् फोटो केला प्रसिद्ध

Rohit Sharma चा बांगलादेशविरुद्ध जर दिसला 'हिटमॅन' अवतार, तर रचणार तीन मोठे रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT