earthquake sakal
मराठवाडा

Earthquake : हिंगोली जिल्हयाला ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप; वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातील गावांचाही समावेश

हिंगोली जिल्हयात वसमत, कळमनुरी व औंढा तालुक्यातील अनेक गावात शनिवारी ता. १५ सकाळी सात वाजता ३.६रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली - जिल्हयात वसमत, कळमनुरी व औंढा तालुक्यातील अनेक गावात शनिवारी ता. १५ सकाळी सात वाजता ३.६रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. अनेक गावांतून मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नंतर सव्वा सात वाजता परत एक हादरा बसला आहे.

हिंगोली जिल्हयातील पांगरा शिंदे ता. वसमत येथे मागील अनेक वर्षापासून भुगर्भातून आवाज येण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अचानक जमिनीतून गडगडाट आवाज येऊन जमीन हादरण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. आजपर्यंत या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी वा वित्त हानी झाली नाही.

शनिवारी सकाळी सात वाजता भुगर्भातून मोठा आवाज झाला. त्यानंतर सात मिनिटांनी लगेचच सव्वा सात वाजून वाजता दुसरा आवाज झाला आहे. जिल्हयातील वसमत पिंपळदरी, आमदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, कंजारा, पुर, काकडदाभा, फुलदाभा, तालुक्यातील पांगरा शिंदे, सिरळी, वापटी, खापरखेडा औंढा तालुक्यातील पिंपळदरी, लक्ष्मणनाईक तांडा, तामटीतांडा, जलालधाबा तसेच कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, नांदापूर, सिंदगी, पोतरा आदी गावांत मोठा आवाज झाला तसेच हिंगोली शहरापर्यंत देखील याचे धक्के जाणवले आहेत.

रिश्टर स्केलमध्ये या भुकंपाची तीव्रता ३.६ एवढी नोंदवली आहे. त्याची खोली दहा किलोमीटर एवढी असल्याचे भुकंप मापकामध्ये नोंद झाली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोन वेळा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भुकंपाचा हादरे जाणवलेल्या पांगरा शिदे या गावातील भागवत शिंदे यांनी सांगितले की, या परिसरात मागील सहा ते सात वर्षापासून जमीनीमधून गुढ आवाज येत आहेत. मात्र हे आवाज कशामुळे येत आहेत याची माहिती अद्यापही गावकऱ्यांना मिळालेली नाही.

एकदा या आवाजाची पाहणी करण्यासाठी स्वारातीम विद्यापीठ नांदेड येथील तज्ञांनी पाहणी केली मित्र त्याचे गुढ उकलले नाही. त्यामुळे गुढ आवाज आता गावकऱ्यांच्या अंगवळणीच पडले आहेत. प्रशासनाने या भागात पाहणी करून आवाजाचे कारण शोधून त्याची माहिती गावकऱ्यांना दिली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Mobile Charging Tips : कितीही वेळ मोबाईल वापरा चार्जिंग संपणारच नाही, सोपी ट्रिक बघाच

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Latest Maharashtra News Updates : सत्तास्थापनेनंतर पहिलाच निर्णय 'लाडकी बहिणीं'चे पैसे वाढवणार?

SCROLL FOR NEXT