rain update sakal
मराठवाडा

हिंगोलीत मागील चोविस तासात ३.४० मिलिमीटर पावसाची नोंद

जिल्ह्यात सोमवारी ता. १३ सलग तिसऱ्या दिवशी अडीच ते साडेतीन यावेळी पाऊस झाला असुन आज सकाळी आठ वाजेपर्यंत ३.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात सोमवारी ता. १३ सलग तिसऱ्या दिवशी अडीच ते साडेतीन यावेळी पाऊस झाला असुन आज सकाळी आठ वाजेपर्यंत ३.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०९.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मागील चोवीस तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत ३.४० मिलिमीटर पाऊस झाला. तालुका निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली तालुका ४.२० मिलिमीटर, कळमनुरी ३.१० वसमत ६.३० औंढा नागनाथ २.४० सेनगाव शुन्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १०९.०४ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शनिवारी व रविवारी व सोमवारी असा सलग तीन दिवस पाऊस झाला. सोमवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. नंतर ऊन पडले व अडीच वाजता ढगाळ वातावरण निर्माण झाले व मेघगर्जनेसह पाऊस झाला हा पाऊस उशीरापर्यंत सुरू होता तसेच मेघगर्जना देखील सुरू होती. हा पाऊस पिकांसाठी हानीकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, काळेकुट्ट आभाळ, पावसाची रिमझिम व मेघगर्जना असे वातावरण उशीरापर्यंत शहरात निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT