कुरुंदा (जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील टोकाई गडावर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षप्रेमीं ऑक्सीजन पार्क व हिरवेगार उद्यानासाठी दोन वर्षापासून अथक प्रयत्न करीत आहेत. भविष्यात झाडांना पाण्याची आवश्यकता निर्माण होणार असल्यामुळे विहिरी करिता जागेची गरज होती. येथील एका शेतकऱ्यांने दोन गुंठे जागा दान दिली आहे.
या गडाच्या पायथ्याशी शेती असलेले शेती शेतकरी इब्राहिम खान यांनी दोन गुंठे जागा विहिरीच्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिली आहे. टोकाई गडावर फुलणाऱ्या झाडांना हातभार देण्यासाठी अनेक नागरिक सरसावले आहेत.
हेही वाचा - नांदेड : तीन दुचाकी चोरांना अटक, दागिणे व दुचाकीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त- शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी -
कुरुंदा येथील टोकाई गड सर्वदूर प्रसिद्ध असून गेल्या दोन वर्षापासून सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा गड हिरवेगार करण्याचा चंग वृक्षप्रेमींनी बांधला आहे. त्यास अभिनेते सयाजी शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने टोकाई गडाला हिरवाईची शालू पसरलेली पाहण्यात मिळते. या ऑक्सीजन पार्क व विविध झाडांची लागवड करण्यात आली. हे झाडे जगविण्यासाठी गडावर पाण्याची आवश्यकता होती. टोकाई गडाच्या पायथ्याशी विहीर खोदण्यासाठी दोन गुंठे जागा नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेचे संचालक व शेतकरी इब्राहीम खान पठाण यांनी दान दिली आहे.
त्या जागेवर येणाऱ्या काळात विहीर खोदून पाण्याचा स्त्रोत उपलब्ध केल्या जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड गडावर करण्यात आलेली असल्याने त्या झाडांना जगविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून या गडाच्या पायथ्याशी शेत असलेल्या मुस्लिम शेतकऱ्याने दोन गुंठे जागा विहीरीसाठी टोकाई देवीला दानपत्रद्वारे दिली आहे.
टोकाई गडावर झाडांना पाणी देण्याकरिता पायथ्याशी बोअरवेल आहे. परंतु त्यावर विद्युत मोटार उपलब्ध नव्हती. ही माहिती आम्ही कुरुंदकर या व्हाट्सअप ग्रुपवर टाकण्यात आली होती. त्यानंतर कुरुंद्याचे भूमीपुत्र चक्रधर दळवी यांनी वृक्षप्रेमींशी संपर्क साधून तातडीने विद्युत मोटार उपलब्ध करून दिली. त्यामुळे पाण्याचे नियोजन लागले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे
|
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.