Hingoli farmer new experiment pink karvand fruit 
मराठवाडा

हिंगोलीत गुलाबी करवंदाचा प्रयोग

कांडलीच्या शेतकऱ्याने उत्पादनातून मिळविले आर्थिक स्थैर्य

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर : कांडली (ता. कळमनुरी) येथे एका शेतकऱ्याने गुलाबी करवंदाची लागवड करून सुरवातीचे तीन वर्ष मेहनत घेतली. पाच वर्षानंतर करवंदे लगडली असून, सध्या मोठ्या शहरांत त्यांची विक्री होत आहे. यातून या शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. ही यशोगाथा आहे मधुकर पानपट्टे या शेतकऱ्याची.

परिसरातील बहुतांश शेतकरी सोयाबीन, कपाशी आदी पारंपरिक पिके घेतात. बऱ्याच वेळा त्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. पीक हाती आले तर भाव मिळेल याची शास्वती नसते. अशातच कांडली या गावातील प्रगतिशील शेतकरी पानपट्टे यांनी सुरवातीला पाच एकरमध्ये गुलाबी करवंदाची (कॅरिसा कारंडस) लागवड केली. एका एकरामध्ये पाचशे ते साडेपाचशे झाडे लावली. त्यांची तीन वर्ष निगा राखली. त्यानंतर एकरी दोन ते अडीच लाख उत्पन्न हाती येत आहे. सध्या या करंवदांचा हंगाम सुरू असून बंगळूर, हैदराबाद, कोलकता, अहमदाबाद या शहरातील व्यापारी ती घेत आहेत.

असे आहे गणित

सर्वसाधारणपणे राज्यात एप्रिल-मे दरम्यान करवंदे होतात. काटेरी झुडुपासारखे झाड, आंबट-गोड काळी करवंदे मिळतात. सर्वसाधारणपणे त्यांची सहसा लागवड होताना दिसत नाही. रानफळ म्हणून त्याकडे पाहिले जाते. गुलाबी करवंदाचा प्रयोग मात्र या जिल्ह्यातील पहिलाच असावा. एका एकरात करवंद लागवडीसाठी २०-२५ हजार रुपये खर्च येतो. सुरवातीला दोन वर्ष झाडांच्या वाढीपर्यंत पाणी द्यावे लागते. खत, फवारणीवर खर्च करण्याची गरज नाही. लागवडीपासून तीन वर्षांनंतर उत्पन्न मिळते. एक झाडापासून ४० वर्षे उत्पादन मिळते. लागवडीनंतर फारसा खर्च नाही. त्यामुळे निव्वळ नफा देणारे हे पीक असल्याचे सांगण्यात आले.

५० ते ८० रुपये किलो भाव

जाम बनविण्यासाठी या गुलाबी करवंदाचा उपयोग केला जातो. त्यामुळे मोठ्या शहरातील जाम उत्पादक कंपन्यांकडून त्याला मागणी आहे. सरासरी ५० ते ८० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे, असे पानपट्टे यांनी सांगितले.

कोट कोट कोट बाजारपेठेचा अभ्यास, मागणीचा विचार करून पीक घेतल्यास यश हमखास मिळते. यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि जिद्द असावी. तोच अनुभव घेत आहे. आता मी आणखी २५ एकरांत केवळ या करवंदांची झाडे लावली. काही वर्षांत उत्पादन मिळेल.

- मधुकर पानपट्टे, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT