हिंगोली : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या (Corona virus controling news order by collector) अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी शनिवार ( ता. १५ ) मे सकाळी सातपासून ते एक जून रोजी सकाळी सातपर्यंत ब्रेक दि चेन (Brake the chain) अंतर्गत सुधारित आदेश जारी केले आहेत. (Hingoli issued a revised order under Break the Chain; Read in detail what they are)
हिंगोली जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते (चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे), पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य (वैयक्तिक, संस्थेसाठी) विक्रेते, यांची दुकाने, आस्थापना ता. १६ मेपासून ता. ३१ मेपर्यंत एक दिवस आड सकाळी सात ते अकरा या वेळेत चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच फक्त दुध विक्री केंद्र, विक्रेते यांना या कालावधीत सकाळी सात ते दहा वाजता व सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. ई- कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील.
जिल्ह्यातील कृषी संबंधित सर्व दुकाने यात खते, बी, बियाणे, कृषी साहित्य, अवजारे, गॅरेज, टायर विक्री, दुरुस्ती दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा इत्यादी दुकाने, आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत चालू राहतील.
तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित दुकाने, आस्थापना यांना दिवसाआड सकाळी सात ते अकरा या कालावधीत केवळ घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील. यासाठी संबंधित व्यापारी, दुकानदार यांनी घरपोच सेवा पुरवण्यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत पास उपलब्ध करुन घ्यावेत.
जिल्ह्यातील खानावळ, रेस्टॉरंट यांना केवळ घरपोच सुविधा देण्यासाठी ता. १५ मे ते एक जुन या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत परवानगी राहील. सर्व शासकीय कार्यालयातील (केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था) उपस्थिती १५ टक्के राहील. परंतु फक्त कोव्हिड-१९ च्या संबंधित अत्यावश्यक सेवेची कार्यालये वगळून राहील. ज्या शासकीय कार्यालयांना १५ टक्क्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवणे आवश्यक आहे. त्या कार्यालय प्रमुखांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
शासन आदेशात नमूद कार्यालयातील उपस्थिती एकूण कर्मचाऱ्याच्या १५ टक्के किंवा पाच कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तेवढे कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील. तसेच अत्यावश्यक सेवे संबंधित प्रत्यक्षात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीत कमी ठेवावी परंतु शंभर टक्केपर्यंत आवश्यकतेनुसार ठेवता येईल.
या कालावधीत आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे केवळ नोंदणी पद्धतीने पार पडता येईल. इतर अन्य कोणत्याही ठिकाणी लग्न सोहळा पार पाडता येणार नाही. खाजगी प्रवासी वाहतूक फक्त निकडीचे किंवा अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैध कारणासाठी वाहन चालक व वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या टक्याच्या मर्यादेपर्यंत ई पास द्वारे प्रवास करता येईल. अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारणासाठी किंवा न टाळण्यासारख्या कार्यक्रमासाठी जसे अंत्यविधी किंवा कुटुंबातील गंभीर आजारी व्यक्तीसाठी ई पास द्वारे परवानगी घेऊन प्रवास करता येईल. जर यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार रुपये दंड लावण्यात येईल.
आ) खाजगी प्रवासी बसेसना वाहतूक करण्यास या कालावधीत पूर्णतः बंदी राहील.हिंगोली जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेस या कालावधीमध्ये बंद राहतील. तसेच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसच्या व्यवस्थापनासाठी बस स्थानक कार्यरत राहतील. परंतु बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस शासकीय बस स्थानकाशिवाय इतर कुठेही थांबणार नाहीत.
या कालावधीत माल वाहतूक करणाऱ्या वाहनात केवळ दोन व्यक्तींना (चालक, क्लिनर, हेल्पर) परवानगी असेल. माल वाहतूक करणारे अशी वाहने बाहेरच्या राज्यातून येत असतील तर त्या वाहनातील चालक व हेल्पर यांच्या कडे ४८ तास अदोगर आरटीपीसीआर तपासणी करण्यात आलेले निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. हे प्रमाणपत्र सात दिवसासाठी वैध असेल.
जिल्ह्यातील सर्व बँका या कालावधीत त्यांच्या नियमित वेळा पत्रकानुसार कार्यालयीन कामकाजासाठी सुरु राहतील. तसेच या कालावधीत बँका दैनंदिन शासकीय कामकाजासाठी व व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी सुरु ठेवता येतील. नागरिकांसाठी बँका दिवसाआड सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत चालू राहतील.
येथे क्लिक करा - पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभास विलंब; विद्यार्थ्यांचे अॅडमिशन खोळंबले
जिल्ह्यातील जे नोंदणीकृत उद्योग आहेत त्यांना त्यांचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कर्मचारी, कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांचे कडून ओळखपत्र घेणे बंधनकारक राहील.इतर राज्यातून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करु इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल.
या कालावधीत जिह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२हिंगोली व सर्व दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालये हे दस्तनोंदणी व इतर अनुषंगिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांसाठी दिवसाआड सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत चालू राहतील. इतर वेळेत सदर कार्यालये त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी चालू राहतील.
या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी , पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल. तसेच मुभा देण्यात आलेले आस्थापना व दुकाने हे कोरोना नियमांचे पालन करत आहेत किंवा कसे याबाबत संबंधित अधिकारी यांनी वेळोवेळी भेट देऊन तपासणी करावी. या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा साथरोग अधिनियमा प्रमाणे कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी करावी असे आदेश दिले आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.