file photo 
मराठवाडा

हिंगोली : अनुकंपाधारक ७० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची होणार तपासणी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या २०१९- २० चालू वर्षासाठी शासन तरतुदीनुसार अनुकंपा उमेदवारांची निवड व नियुक्ती प्रक्रिया देण्याची कारवाही सुरु आहे. त्यामुळे जुलै २०२० अखेर अनुकंपाधारक उमेदवारांच्या जेष्ठता यादीतील ७० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी बुधवारी ( ता. १४) षट्कोनी सभागृहात सकाळी नऊ वाजता केली जाणार आहे.  

मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या अनुकंपा धारकांच्या व सेवा जेष्ठता यादीनुसार जागा भरल्या जात नव्हत्या ,त्यातच पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने ही प्रक्रिया थंडावली होती. आता कोरोना संसर्ग प्रमाण कमी अधिक असल्याने शासनाने जेष्ठता यादीनुसार अनुकंपा धारकांची निवड प्रक्रिया राबवून नितुक्ती देण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जुलै २०२० अखेर अनुकंपा धारक जेष्ठता यादीतील ७० उमेदवारांचा यात समावेश आहे. ही प्रक्रिया बुधवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषदेच्या षट्कोनी सभागृहात सुरु होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क, सानिटायझर ,सामाजिक अंतर पाळत व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल.

उमेदवारांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक तैनात केले जाणार

ज्या उमेदवारांना सर्दी, खोकला, ताप या कोरोना आजाराची लक्षणे आहेत, आशा उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधीला या कार्यालयाच्या पूर्व परवानगीने पाठवता येईल. ज्या उमेदवारांचे भ्रमण ध्वनी, किंवा ईमेल ,व्हाट्सअप नंबर कार्यालयाकडे आहेत अश्याना यादिवशी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.या दिवशी जे उमेदवार गैरहजर असतील त्यांचे नंतर आक्षेप, हरकत नोंदविल्यास ती ग्राह्य धरल्या जाणार नाही. कार्यालयातील उपलब्ध अभिलेख्या वरून पुढील कारवाई केली जाणार आहे.कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता या दिवशी उमेदवारांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक तैनात केले जाणार आहे.उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी शिवाय सभागृहात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी,तसेच सर्व सूचनांचे पालन करणे अनुकंपा धारक उमेदवारांना बंधनकारक आहे.असे आवाहन  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी  केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू

Snapchat New Feature : खुशखबर! स्नॅपचॅटमध्ये आलं भन्नाट फीचर; तुम्ही पाहिलं काय?

Michael Waltz : मायकेल (माइक) वाल्ट्झ- `इंडिया कॉकस’ व भारत

SCROLL FOR NEXT