Janawar Bajar sakal
मराठवाडा

हिंगोली : गड्या आपली बैलजोडीच बरी!

ट्रॅक्टरद्वारे मशागतीचा खर्च वाढल्याने पारंपरिक मशागत

राजेश नागरे

हिंगोली : इंधन दरवाढी ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीचा खर्चही वाढला आहे. वाढीव पैसे देऊनही बऱ्याच वेळा वेळेवर ट्रॅक्टर उपलब्ध होत नाही. त्यातच आता पावसाळा जवळ आला. त्यामुळे अनेक शेतकरी बैलजोडीने पारंपरिक पद्घतीने मशागत करीत आहेत. त्या अनुषंगाने पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे सुरू झाले आहे. काही शेतकरी जुने बैल विक्री करून नवीन बैलाची खरेदी करीत आहे. येथील बैलबाजारात मंगळवारी (ता.२४) बैलजोड्या विक्रीसाठी आल्या होत्या. मात्र या त्यांचेही भाव लाखावर गेले आहेत.

पेरणीपूर्वी कामांना वेग आला आहे. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे; तसेच अधूनमधून पाऊसदेखील पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या कामाची ओढ लागली आहे. अनेक शेतकऱ्यांची पेरणीपूर्वी कामे आटोपली असल्याने शेतकरी खते, बियाणे, तणनाशके खरेदी करण्यासाठी कृषी केंद्राकडे चकरा मारत आहेत. काही शेतकरी जुनी बैलजोडी विकून नवीन बैलजोडी खरेदीसाठी बैलबाजारात धाव घेत आहेत. हिंगोलीत दर आठवड्याला भरणाऱ्या बैल बाजारात मंगळवारी बैलजोड्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी चारापाण्याअभावी तर काही जणांनी जुन्या बैलजोड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. यामुळे येथे बैलजोड्या खरेदी व विक्रीसाठी शेतकरी व व्यापारी देखील दाखल झाले होते. सध्या शेतात, नांगरणी, वखरणीची कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात आहेत. त्याचे दरदेखील चांगलेच वाढले आहेत. एका तासाच्या नांगटीसाठी सहाशे ते सातशे रुपये घेतले जात आहेत. वखरणीसाठी एक एकर जमिनीला सहाशे रुपये घेतले जात असल्याचे शिवाजी कऱ्हाळे यांनी सांगितले. यामुळे ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी आहे अशा शेतकऱ्यांनी बैलजोडीचा वापर करून कामे करणे सुरू आहे.

उन्हाळा शेवटच्या टप्प्यात आला आहे. चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने बैलजोडी विक्रीसाठी आणली आहे. पेरणीसाठी कालवधी असल्याने नंतर परत बैलजोडी खरेदी करणार आहे.

- डिगांबर मामनगार, शेतकरी, असोला

बैलबाजारात चांगल्या बैलजोडीची किंमत एक लाखावर होती तर साधारण बैलजोड्या साठ, सत्तर व ऐंशी हजार रुपयांप्रमाणे विकल्या जात आहेत.

- एकनाथ नागरे , शेतकरी ,पार्डी (सा.)

बैलांचे संगोपनही खर्चिक

पेरणीसाठी अनेक शेतकरी बैलजोडीचा वापर करीत असल्याने जुनी बैलजोडी विकून नवीन बैलजोडी घेण्यासाठी बैलबाजारात दाखल झाले असल्याचे केशवराव होरे यांनी सांगितले. पेरणी, कोळपणी ही शेतातील कामे करण्यासाठी शेतकरी बैलजोडीचा वापर अधिक करतात. मात्र, चारापाण्याअभावी अनेकांना बैलजोडी बाळगणे परवडणारे नसल्याने काही शेतकरी हंगामापुरते बैलजोड्या ठेवत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Politics: ...तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील, मुख्यमंत्रीपदावरून BJPच्या बड्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Maharashtra Cabinet: नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंगला सुरुवात; कोणते आमदार गेलेत नेत्यांच्या भेटीला? जाणून घ्या

Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद; सेन्सेक्स 1000 अंकांच्यावर, निफ्टीने पार केला 24,200चा टप्पा

SCROLL FOR NEXT