file photo 
मराठवाडा

हिंगोली : जिल्ह्यात यंदा दीड लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार

राजेश दारव्हेकर

हिंगोली : यावर्षी अतिवृष्टीने  शेत शिवारात  पाणी साचल्याने रान चिबडून गेली आहेत मागील वर्षी पेक्षा या वर्षी पेरणीला उशीर झाला असून यंदा जिल्ह्यात एक लाख ५६ हजार ६३४ हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितले.

रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या ऑक्टोबर महिन्यात करणे आवश्यक आहे. मात्र यंदा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरिपातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना शासनाने सरसगट  नुकसान भरपाई दयावी असे आवाहन सर्वच पक्षांनी लावून धरले आहे. किती नुकसान याची आकडेवारी अद्याप स्पष्ट झाली नाही.यंदा सरासरी ११०टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सिद्धेश्वर, इसापुर ,येलदरी या मोठ्या प्रकलापासह लहान व मध्यम सिंचन तलाव देखील १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे यंदा सर्व विहिरी काठोकाठ भरल्याने रब्बी पिकांना मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होणार असल्याने यंदा गहू, हरभरा, करडई, ज्वारी,आदी पिकांच्या पेरणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२० मधील पिकनिहाय अपेक्षित पेरणीच्या क्षेत्राची आकडेवारी पुढील प्रमाणे असणार आहे. यामध्ये रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १२ हजार ५१ एवढे असून बारा हजार ४४३ हजार हेक्टरवर पेरणी केली जाणार आहे. गहू ४४ हजार ४७० हेक्टर हे सर्वसाधारण क्षेत्र आहे. तर ३६ हजार ५५७ हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे.मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १०१९ हेक्टर असून ८५२ हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे. हरभरा पिकाचे ७२ हजार ८५६ हेक्टर हे सर्वसाधारण क्षेत्र असून, एक लाख ६५ हजार हेक्टरवर पेरणी केली जाणार आहे. याशिवाय तृणधान्य, कडधान्य, अन्नधान्य असे एकूण मिळून जिल्ह्यात यंदा एक लाख ५६ हजार ६३४ हेक्टरवर रब्बी हंगामात पेरणी केली जाणार आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी गहू, हरभरा, पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT