hingoli sakal
मराठवाडा

Hingoli : रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘राष्ट्रवादी’चे रास्ता रोको

लिंबाळा ते येलदरी रस्त्याची चाळणी झाली

सकाळ वृत्तसेवा

सेनगाव : फाळेगाव ते जिंतूर या राज्य रस्त्यावरील लिंबाळा ते येलदरी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वेळीच रस्ता दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता. १४) सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लिंबाळा ते येलदरी रस्त्याची चाळणी झाली असून, रस्त्यावर मोठमोठे- खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खड्डे पाण्यानी भरले असून, वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने वेळीच रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी तालुकाध्यक्ष रवी गडदे, माजी नगरसेवक उमेश देशमुख, सरपंच उत्तम ठोके, जगन माकोडे, बाबाराव माकोडे, विनायक हराळ, शेषराव जाधव, गजानन गडदे, गजानन वाघमोडे, झनक ठोके यांची उपस्थिती होती. आंदोलनामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

यावेळी पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. आंदोलकांकडून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. लवकरात- लवकर रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT