Hingoli  sakal
मराठवाडा

Hingoli : अनुपस्थित शिक्षकाबाबत ग्रामस्थांनी विचारला जाब

शिक्षकाची शाळेला दांडी

राजेश नागरे

कळमनुरी : केंद्रप्रमुखाचा अतिरिक्त पदभार असलेल्या शिक्षकांकडून कामाच्या नावावर शाळेत गैरहजर राहण्याच्या प्रकाराविरोधात मंगळवारी (ता. २८) गावकऱ्यांनी एकत्र येत अधिकाऱ्यांना जाब विचारला. या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांकडून केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार काढण्याचे आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तालुक्यातील मोरवड येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेतील शिक्षकांची संख्या आठ आहे. विद्यार्थी संख्याही जवळपास २२५ च्या वर आहे. शाळेतील एका शिक्षकाकडे केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. हा या अतिरिक्त पदभाराच्या नावाखाली संबंधित शिक्षकाची शाळेवरील उपस्थिती कमी झाली असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, शिक्षकाच्या सततच्या अनुपस्थितीमुळे कंटाळून मंगळवारी गावातील गजानन सोळंके, अप्पाराव दुधाळकर, बळीराम गलांडे, केशवराव गलांडे, नथू गलांडे, नामदेव बेले, ज्ञानेश्वर कोरडे, उत्तम बोडके, सुभाष डवले, रामकिसन हाळसे यांच्यासह नागरिकांनी शाळेसमोर शाळेच्या वेळेत एकत्र येत माहिती घेतली. यावेळी शाळेतील काही शिक्षक विलंबाने हजर झाले तर केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी असलेला शिक्षक व मुख्याध्यापक गैरहजर असल्याचे आढळून आले. या प्रकाराची माहिती ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी दत्ता नांदे यांना दिली. शाळेवर पोचून गटशिक्षणाधिकारी यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि या सर्व प्रकाराची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना दिली.

शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसह भ्रमणध्वनीवर संवाद साधला. ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकून घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भात संबंधित शिक्षकाकडे असलेल्या केंद्रप्रमुखाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि संबंधित शिक्षकाला शाळेवर पूर्णवेळ अध्यापन करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT