Nanded News 
मराठवाडा

तुम्ही वाचाच : कशा रुंदावतात अनुभवाच्या कक्षा

प्रमोद चौधरी

नांदेड :  शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत 'सहल' या उपक्रमामुळे जिवंत अध्ययन अनुभव देता येतात. तसेच सहलीमुळे बालकांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावत असतात, असे मत साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी व्यक्त केले. 

सहलींतून होतो विद्यार्थ्यांचा विकास
शैक्षणिक सहल हा शालेय जीवनातील एक आनंदाचा भाग असतो. सहल म्हणजे मजा. सहल म्हणजे मोकळीक. सहल म्हणजे आनंद. हे खरे असले तरी मजा करताना विद्यार्थी अनेक गोष्टी शिकत असतात. शाळेच्या बाहेरील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात भर घालतात. शाळा म्हटले की, शैक्षणिक सहलीची आठवण येते. शाळेकडून शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी एकाच दिवसाची सहल नेली जायची. या शैक्षणिक सहली म्हणजे एक शालेय उपक्रमच आहे. 

ऐतिकाहासिक स्थळांना दिले जाते प्राधान्य
पूर्वी शालेय संस्था या फक्त शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे असणा-या स्थळांना, विद्यार्थ्यांना घेऊन जायचे.  जसे की, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे, वाचनालये, परंतु आता ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणिय स्थळे, गडकिल्ले, समुद्रकिनारे, विविध संग्रहालये, कारखाने अशा विविध स्थळांवर नेल्या जातात. शैक्षणिक सहली काढण्यामागे शालेय संस्थेचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे मुलांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पाडणे.  

‘मी पाहिलेला किल्ला’ बालसभा
किल्ला परिसरात प्रवेश केल्यानंतर तटबंदी, खंदक, लालमहाल, शिशमहाल, बारादरी महाल, कैदखाना, अंबरी तोफ, बारुदखाना, राजाबाग, स्वारगेट, बुरुज, चोरवाटा, घोड्यांच्या पागा, विविध मुर्तीशिल्पे, विहीरी, आकर्षक कारीगरीची स्थापत्यकला आदी बाबींचे मुलांनी निरीक्षण केले. त्यानंतर किल्ल्यातच 'मी पाहिलेला किल्ला' या विषयावर बालसभा घेण्यात आली. बालसभेच्या अध्यक्षस्थानी सानिया पठाण तर वक्ते म्हणून शादूल शेख, श्रुती मठपती यांची उपस्थिती होती. बालसभेत संघरत्न गोडबोले, अंजली कदम, संध्या गच्चे, गणेश मठपती, सूरज पंडित, प्रतिक्षा गोडबोले यांनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन गंगासागर शिखरे हिने तर आभार दिव्या गच्चे हिनी मानले.   

कंधार येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला भेट दिली असता राजेश्वर कांबळे आणि परशुराम केंद्रे यांच्याकडून जवळा जिल्हा परिषद शाळेच्या सहलीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. तसेच किल्ल्यातील विविध ठिकाणांबाबत माहिती व मार्गदर्शन केले. किल्ल्याचे अवलोकन करतांना घ्यावयाची काळजी व आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

नियोजनात यांचा होता सहभाग

सहलीच्या नियोजनात मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार सूरज गवळी, योगेश मठपती, चंद्रकांत गोडबोले, लक्ष्मण शिखरे, वैभवी शिखरे, विठ्ठल तोटकुलवार, रितेश गवारे, कोमल चक्रधर, महाजन तेलंगे, अंजली झिंझाडे, अक्षरा शिंदे, मुस्कान पठाण, रितेश शिखरे यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT