Beed Crime Sakal
मराठवाडा

Beed Crime News : तिन लेकरं उघड्यावर; पत्नीचा खुन करुन पतीने संपवले जीवन

सकाळ वृत्तसेवा

Beed Crime News : किरकोळ वाद व संशयातून पत्नीचा उशिने तोंड दाबून खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. १२) शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाणे हद्दीतील वृंदावन कॉलनी भागात समोर आली. राधा भागवत वायभट (वय २६) असे खुन झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

तर, भागवत बलभीम वायभट (वय ३७) असे खुन करुन आत्महत्या केलेल्या पुरुषाचे नाव आहे. तालुक्यातील लिंबागणेश येथील दाम्पत्य शहरात वास्तव्यास होते. या घटनेमुळे तीन लेकरं उघड्यावर आली आहेत.

तालुक्यातील लिंबागणेश येथील भागवत वायभट याच्याकडे छोटे वाहन होते. गावाकडून रोज भाजीपाला व छोटे साहित्य बीडच्या बाजारात भाड्याने आणणे हा त्याचा व्यवसाय होता. त्यासाठी तो मागच्या दिड वर्षांपासून शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाणे हद्दीतील औद्योगीक वसाहत भागातील वृंदावन कॉलनीत भाड्याने खोली करुन राहत होता. त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होत असत. भागवत हा पत्नीवर संशय घेत असायचा, असे पोलिस सुत्रांनी सांगीतले.

दरम्यान, भागवत वायभट शनिवारी रात्री आपले काम उरकून घरी आला. यावेळी पत्नी राधा व भागवत याच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. यामध्ये त्याने पत्नीला मारहाणही केली. त्यानंतर मध्यरात्रीच भागवते उशिने पत्नी राधाचे तोंड व नाक दाबले. यामध्ये गुदमरून राधाचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वत: देखील दरवाजा बाहेर असलेल्या हुकाला दोरीने गळफास घेतला.

सकाळी झोपेतून उठवल्यावर त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलीने हा प्रकार पाहला. तीने रडायला सुरूवात केली. त्यामुळे या इमारतीतले लोक या खोलीजवळ गेले. त्यांनी हा सर्व प्रकार शिवाजीनगर पोलिसांना कळवला. पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेले.

तीन लेकरं उघड्यावर

दरम्यान, राधा ही भागवत वायभट याची दुसरी पत्नी आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचा नऊ वर्षांपूर्वी किडनी विकाराने मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पहिल्य पत्नीची छोटी बहिण राधा हिच्यासोबत दुसरा विवाह केला. पहिल्या पत्नीपासून यशराज वायभट (वय १३) व रुपाली वायभट (वय ११) ही दोन मुले होती. तर, राधा हिच्यापासून अनुष्का (वय सात) ही मुलगी होती. पहिल्या पत्नीचे मुले गावाकडे आजी - आजोबांकडे राहत. तर, राधा व भागवत यांच्यासोबत अनुष्का राहत असे. या खुन व आत्महत्येमुळे तिन्ही लेकरं उघड्यावर आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT