file photo 
मराठवाडा

या प्राण्याने डोळे फुंकल्यास 

नवनाथ येवले

नांदेड : एखादा माणूस हा एकावेळी एक आणि दुसऱ्यावेळी दुसरच काही बोलत असतो, तेव्हा आपण त्याला रंग बदलणाऱ्या सरड्याची उपमा देतो. सरडा हा सुमारे तिन हजार ८०० प्रजातीतील खवले असलेला सरिसृपांचा एक मोठा गट आहे. यापैकीच एक घोयरा सरडा यास काही धावता येत नाही. त्यामुळे स्वत:चा बचाव कसा करणार? मग अर्थातच सरुपता म्हणजेच केमोफ़्लेज होऊन सभोवतालच्या रंगानुरुप होणं! ह्याच्या शरिरातल्या रंगपेशी मेंदुकडुन आज्ञा आल्यावर शक्यतो हुबेहुब रंग धारण करायचा प्रयत्न करतात. जर ते शक्य होत नसेल नी शत्रु जवळच आला तर घोयरा स्वत:च अंग आणि गळा फ़ुगवुन आपण भयानक असल्याचा “ड्रामा” करतो. यांस दात असतातच. त्यामुळे घोयरा चावल्यास लहानशी जखम होते. अनेकजण याला पाळण्याचा प्रयत्न करतात. घोयरा सरड्यासही सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणेच जीवंत भक्ष लागतं. याची ‘‘दूरद्रुष्टी” चांगली असते पण जवळच्या बाबतीत बर्यापैकी आनंदीआनंद असतो.
 
घोयरा रंग का बदलतो
 सरडा का रंग बदलत असतो तर आपल्या रक्षणासाठी त्याला त्या त्या वेळी आणि त्याजागी मिसळून जाण्यासाठी किंवा एखाद्या शत्रुंपासून रक्षण होण्यासाठी तसेच आपली शिकार मिळवण्यासाठी सरडा हा रंग बदलत असतो. त्याच्या त्वचेखाली असणाऱ्या रंग द्रव्यांमुळे तो रंग बदलत असतो. मुळात त्याचा रंग हा हिरवा असतो. त्याचप्रमाणे त्याच्या अंगावर पडणारे प्रकाश शिवाय आजूबाजूचे वातावरण यानुसारही तो रंग बदलत असतो. 

सरड्याने डोळ्यावर फुंक मारल्यास 
काही लोकांचा असा समज आहे की या सरड्याने जर तुमच्या डोळ्यात फुक मारली तर तुमचे डोळे जातात.  हा केवळ एक गैरसमज व अफवा आहे. सरडा हा बिनविषारी प्राणी आहे त्यामुळे तो चावला किंवा त्याने फुंक मारल्यास आपल्या शरीराला कोणताही अपाय होत नाही. हे लक्षात घ्यायला हवं आणि लहान मुलांनाही सांगायला हवे. 

घोयराची वैशिष्ट्ये 
सरड्याची नखे ही खूप तीक्ष्ण असतात. जेणेकरून झाडावरून आणि फांद्यांवरून चालताना आपली पकड मजबूत रहावी. या सरड्याला इंग्लिशमध्ये ‘शामेलियन लीझर्ड’ तर मराठीत याला घोयरा असे म्हणतात. आपल्या आजूबाजूच्या झाडीमध्ये, शेतात, जाता-येता सहज दिसणाऱ्या सरड्यांच्या वर्गात मोडणारा हा घोयरा सरडा मात्र मुबलक प्रमाणात मिळत नाही. अख्ख्या भारतात घोयरा सरड्याची फ़क्त एकच जात मिळते. तहान लागल्यावर हा पानावरील दवाचे पाणी पीत असतो जास्त करून झाडावर राहायला याला आवडते. त्याचे खाद्य हे किडे, भुंगे, फ़ुलपाखरं, मोठे मुंगळे अशा प्रकारचे आहे. 

शेतकऱ्यांचा मित्र 
सरडा हा निसर्गातील महत्वाचा घटक आहे. त्याचे भक्ष किटक आहेत. त्यामुळे शेतशिवारातील शेती पिकांवर हल्ला करणाऱ्या किटकांचा भक्षक सरडा हा शेतकऱ्यांचा मित्र आहे.  
अतिंद्र कट्टी : मानद वन्यजीव रक्षक, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

SCROLL FOR NEXT