file photo 
मराठवाडा

‘कल्याण’ बुकीवर आयजींचा छापा 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लोहा शहरात मागील काही दिवसांपासून झन्ना- मन्ना, कल्याण, मिलन नावाचा मटका जुगार राजरोसपणे सुरू आहे. मुख्य रस्त्यावर जुगाराचा डाव चालत असल्याने महिलांना व विद्यार्थीनींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकां (आयजी) कडे आल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाद्वारे कारवाई करून १३ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल व नगदी असा एक लाख २८ हजार ६०० रुपयाचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे बंद म्हणणाऱ्या नांदेड पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. 

लोहा शहरात राजकिय दबाव वापरून जुगार, मटका माफिया सर्रासपणे उजळमाथ्याने मुख्य रस्त्यावर आपले अवैध धंदे चालवित आहेत. या जुगार अड्ड्यावर येणारे जुगारी हे नशेत असतात. त्यामुळे रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या महिला व विद्यार्थीनीसह सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक पोलिस याबाबीकडे ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील अवैध धंदे बंद करा अशी अनेकवेळा सुज्ञ नागरिकांकडून पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. मात्र त्यांनीही लोहा जुगारासंबंधी गप्प राहणे पसंद केले. शेवटी नांदेड पोलिसांना अंधारात ठेवून विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी आपल्या पथकाला कल्याण नावाच्या जुगाराची माहिती दिली. तसेच या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. 

आयजींचे पथकाकडून यांना केले अटक

आयजींच्या पथकानी लोहा शहरात सापळा लावून शनिवारी (ता. १४) दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकासमोरील व्यंकटेश मशनरीजच्या समोरील मैदानावर सुरू असलेल्या बुक्कीवर छापा टाकला. यावेळी पोलिस दिसताच काही जुगारी पसार झाले. मात्र पोलिसांनी धनंजय उर्फ धन्नु गोविंदराव पाटील रा. बोरगाव (ता.लोहा), भुवनेश्‍वर साहेबराव कदम रा. रायवाडी, योगेश केशव टेकाळे रा. शेवडी, अंगद मंजाजी जामगे रा. शिवणी, वामन रावसाहेब पवार रा. सायाळ, शहाजी संभाजी पवार रा. सायाळ, सुर्यकांत मारोती पोई रा. सावरगाव, सुग्रीव संभाजी कोरडे रा. हिप्परगा, परमेश्‍वर ज्ञानेश्‍वर मोरताळे रा. रा. सायाळ, भानुदास मानेजी वडजे रा. आईनवाड (ता. पालम), राजेश मारोती फुलपगार रा. लोहा, त्र्यंबक रमेश कापसे रा. खडकमांजरी आणि भानुदास हरी भालेराव रा. हरसद यांना अटक केली.

हे उघडून तर पहा-- नांदेडातही एटीएम फोडून २६ लाख लंपास
 
एक लाख २८ हजाराचा आवज जप्त 

त्यांच्याकडून ६८ हजाराचे १३ मोबाईल आणि नगदी ६० हजार ५६५ असा एक लाख २८ हजार ८०० रुपयाचा ऐवज जप्त केला. पोलिस ज्ञानेश्‍वर श्रीमंगले यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात कलम १२ (अ) महाराष्‍ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास फौजदार श्री. राठोड करीत आहेत. या कारवाईमुळे लोहा पोलिस निरीक्षक आयजीच्या रडारवर आल्याने त्यांच्यावर काय कारवाई होईल हा येणारा काळच सांगेल.  

   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : मराठी माणसांचे दोन पक्ष तोडण्याचे काम भाजपाने केले - जयंत पाटील

SCROLL FOR NEXT