जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे नियम कडक केल्याने गर्दीवर नियंत्रण आले. यामुळे कोरोनाची साखळी कमी होण्यास मदत झाली.
हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसापूर्वी कोरोनाचा (Corona) आलेख वाढता होता. त्यावर नियंत्रण मिळविल्याने बाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण देखील घटले आहे. तर 250 च्यावर रुग्ण बरे होत असल्याने जिल्हासाठी समाधानाची बाब आहे. (In Hingoli district the death rate of corona patients has come down is)
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढता होता. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. मागच्या काही दिवसांपूर्वी एका दिवसात तीनशेपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत होते तर मृत्यू दर दहापेक्षा अधिक होता. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, नगरपालिका व इतरही विभागाने यासाठी पुढाकार घेत शासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या नियमावलीची अमंलबजावणी काटेकोरपणे अमंलात आणली. नागरिकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला, यामुळे यावर नियंत्रण मिळत आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे नियम कडक केल्याने गर्दीवर नियंत्रण आले. यामुळे कोरोनाची साखळी कमी होण्यास मदत झाली. तसेच जिल्ह्यात अँन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या सुरू असल्याने बाधित रुग्ण सापडून त्यावर उपचार झाले. यासह जिल्ह्यात लसीकरणदेखील वेग आल्याने आतापर्यंत 45 ते 60 वयोगटातील ७४ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील दिड हजार युवकांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने यात अडथळा येत आहे. दरम्यान, या सगळ्या बाबीची योग्य अमंलबजावणी झाल्याने व नागरिकांच्या प्रतिसादाने हे शक्य झाले आहे.
जिल्ह्यात आज घडीला १३ हजार ४८६ कोरोना बाधितांची स़ंख्या आहे. आतापर्यंत १२ हजार १०० रुग्ण बरे झाले आहेत. एक हजार १३७ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या रुग्णांपैकी ४२४ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. ४५ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपँप मशीनवर ठेवण्यात आले आहे. मंगळवारी (ता. चार) एका दिवसात ६५ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर चार जणांचा मृत्यू झाला २६२ रुग्ण बरे झाले आहेत. (In Hingoli district the death rate of corona patients has come down is)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.