Latur Lok Sabha Esakal
मराठवाडा

Latur Lok Sabha: काँग्रेसच्या या खेळीमुळे भाजपला मिळणार 'टफ फाईट'? एकतर्फी वाटणाऱ्या लातूर लोकसभेत निर्माण झाली चुरस!

Latur Lok Sabha: या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुका भाजपने एकतर्फी जिंकलेल्या आहेत. यावेळेस देखील भाजपला ही निवडणूक एकतर्फी वाटत होती, पण डॉ. काळगे यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे.

हरी तुगावकर

Latur Lok Sabha: लोकसभेच्या लातूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्यावर पुन्हा एकदा डाव लावला आहे. तर काँग्रेसने वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेल्या डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला एकतर्फी वाटणारी निवडणूक डॉ. काळगे यांच्या उमेदवारीने चुरशीची झाली आहे. या मतदारसंघात अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मानणाराही मोठा मतदार आहे. तो आपल्याकडे वळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने उद्योजक असलेले नरसिंग उदगीरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

लोकसभेचा लातूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवले आहे. पहिल्याच यादीत श्रृंगारे यांची उमेदवारी जाहीर करुन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पक्षाचे नेते माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे.

पहिल्या टप्प्यात ते नाराज दिसून आले. त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन निलंगेकरांच्या खांद्यावर सर्व जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांपासून ते कामाला लागले आहेत. श्रृंगारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार बाबासाहेब पाटील या महायुतीच्या नेत्यांची साथ आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात येथे येऊन आढावा बैठक घेतली, तसेच पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी हातात ‘कमळ’ घेतले आहे. त्यामुळे श्रृंगारे यांची बाजू भक्कम मानली जात आहे. सध्या श्रृंगारे यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यावर जोर दिला आहे.

गेल्या दोन निवडणुकांपासून डॉ. काळगे यांचे नाव भाजपकडून चर्चेत राहिले आहे. यावेळेस मात्र काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. डॉ. काळगे यांची जबाबदारी माजीमंत्री अमित देशमुख व त्यांचे बंधू आमदार धीरज देशमुख यांच्या खांद्यावर आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून हे दोन्ही देशमुख बंधू प्रचारासाठी रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत.

दररोज सकाळी बाभळगावच्या गढीवर शहरातील विविध घटकातील प्रमुखांच्या बैठका घेणे, दुपारी गावांना भेटी देणे, रात्रीच्या वेळी शहरात कॉर्नर बैठका घेऊन मतदारांना काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत. डॉ.काळगे यांनीही मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला आहे. डॉ. काळगे हे वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असल्याने सर्व डॉक्टर्स लॉबी कामाला लागली आहे.

या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुका भाजपने एकतर्फी जिंकलेल्या आहेत. यावेळेस देखील भाजपला ही निवडणूक एकतर्फी वाटत होती, पण डॉ. काळगे यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. गेल्या निवडणुकीत एक लाख १२ हजार मते घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने यावेळी नरसिंग उदगीरकर यांना रिंगणात उतरवले आहे. उदगीरकर यांनी देखील गाठीभेटीवर भर दिला आहे. या मतदारसंघात ता. बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT