latur sakal
मराठवाडा

Latur News : बसगाड्यांची उद्‌घोषणा झाली, सापडल्या बेपत्ता मुली ; पोलिसांनी लावला अवघ्या चोवीस तासांत दोन्ही बहिणींचा शोध

दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी (ता. ३०) घडली होती. या प्रकरणी औराद शहाजनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे मुलींनी मैत्रिणीला सोशल मीडियावर कॉल केला. सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी हा कॉल ऐकला, त्यात बसगाड्यांची उद्‌घोषणा ऐकू आल्याने पोलिसांना अवघ्या चोवीस तासांमध्ये त्यांचा ठावठिकाणा कळण्यास मदत झाली.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी (ता. ३०) घडली होती. या प्रकरणी औराद शहाजनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे मुलींनी मैत्रिणीला सोशल मीडियावर कॉल केला. सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी हा कॉल ऐकला, त्यात बसगाड्यांची उद्‌घोषणा ऐकू आल्याने पोलिसांना अवघ्या चोवीस तासांमध्ये त्यांचा ठावठिकाणा कळण्यास मदत झाली.

आई-वडील नेहमी अभ्यास करा म्हणून तगादा लावत असल्याने रागाच्या भरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणी घरातून मंगळवारी निघून गेल्या. औराद शहाजनी पोलिस ठाण्यात याबाबत बेपत्ता झाल्याची नोंद घेण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी पोलिसांचे पथक तयार करून बेपत्ता मुलींचा शोध सुरू केला. मुलींच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे संपर्क साधून सखोल विचारपूस करून माहिती मिळविण्यात येत होती.

दरम्यान बेपत्ता झालेली मुलगी एका मैत्रिणीला सोशल मीडियावर कॉल करत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधला. दरम्यान, बेपत्ता मुलगी ही मैत्रिणीला कॉलवर बोलत असताना बसस्थानकावर बसगाड्यांची उद्‌घोषणा पोलिसांना ऐकू आली. त्यामुळे या मुली कुठल्यातरी बस स्थानकावर असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ नांदेड, लातूर, धाराशिव, उदगीर, निलंगा व इतर बसस्थानकावर कार्यरत असलेल्या पोलिसांना माहिती दिली.

या मुलींचे फोटो कर्तव्यावरील पोलिसांना पाठविण्यात आले. त्यानंतर या मुली लातूर येथील बस स्थानकावर असल्याचे कर्तव्यावरील पोलिस अंमलदाराच्या निदर्शनास आले. त्यावरुन महिला पोलिसांच्या मदतीने दोन्ही अल्पवयीन मुलींना गांधी चौक पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर औराद शहाजानी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या अल्पवयीन मुलींकडे विचारपूस केली असता आम्हाला आमच्या आई-वडील हे नेहमी अभ्यास करा म्हणून तगादा लावत असल्याने आम्ही रागाच्या भरात घर सोडून कोणालाही न सांगता निघून आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दूरपडे, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे, पोलिस अंमलदार श्रीनिवास चिटबोने, मनोज मोरे, विश्वनाथ डोंगरे, पोलिस ठाणे गांधी चौकचे पोलिस अंमलदार कत्ते तसेच सायबर सेलचे गणेश साठे यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT